ही यशोगाथा सीमेपलीकडील आहे. एका भारतीय वंशाच्या उद्योगपतीने इथे झेंडा गाठला आहे. ही व्यक्ती शेजारील देशातील,पाकिस्तानमधील पहिली अब्जाधीश आहे. संपत्तीच्या बाबतीत ही व्यक्ती तशी देशातील दुसरी श्रीमंत व्यक्ती आहे. गरीबी आणि आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पाकिस्तानातील जनतेसाठी या व्यक्तीने लाखो रुपये दान केले आहे. त्यांच्या गॅरेमध्ये अर्ध्यांहून अधिक आलिशान कारचा ताफा आहे. यामध्ये मर्सिडीज, रॉल्स रॉयल्स यांचा समावेश आहे. त्यांचा थाट एखाद्या नवाबाला पण लाजवेल असा आहे.
मियाँ मोहम्मद मंशा
मियाँ मोहम्मद मंशा यांचा जन्म 1941 मध्ये भारतात झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबिय 1947 मध्ये पाकिस्तानात गेले. पाकिस्तानमध्ये त्यांनी व्यापाराला सुरुवात केली. त्यानंतर हा व्यापार, व्यवसाय मियाँ मोहम्मद मंशा यांच्या पिढीने पुढे वाढवला. त्यांचे नाव पाकिस्तानच नाही तर आशियातील मोठ्या उद्योगपतींमध्ये घेतले जाते. मंशा हे पाकिस्तानचे पहिले अब्जाधीश आहेत. आजही ते पाकिस्तानातील दुसरे श्रीमंत उद्योगपती आहेत. श्रीमंतीतच नाही तर दानशूरपणातही ते मागे नाहीत.
अनेक उद्योगात घेतली भरारी
मंशा कुंटुबिय पाकिस्तानात गेल्यावर अनेक उद्योगात शिरले. त्यांनी बाजारातील मागणी हेरुन उद्योग सुरु केले. स्थानिक पातळीवर कोणती वस्तू विक्री होऊ शकते, याचा अंदाज बांधत त्यांनी यश मिळवले. सध्या पाकिस्तानमध्ये शाहित खान हे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांच्यानंतर मंशा यांचा क्रमांक लागतो.
मंशा यांची संपत्ती तरी किती
वृत्तानुसार, मंशा यांची नेटवर्थ, एकूण संपत्ती जवळपास 5 अब्ज डॉलर, 43 हजार कोटी रुपये इतकी आहे. इतकी संपत्ती असली तरी त्यांना गर्व नाही. ते सढळ हाताने मदत करत आहेत. सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी सरकारला मोठी रक्कम दिली आहे. मंशांच्या ताफ्यात Mercedes E-Class, Jaguar convertible, Porsche, BMW 750, Range Rover आणि Volkswagen अशा कार आहेत.
भारतात कापसाच्या उद्योगात
मंशा यांचे वडिल कोलकत्यात राहत होते. फाळणीपूर्वी ते कापासाचा व्यवसाय करत होते. पाकिस्तानात गेल्यावर त्यांच्या वडिलांनी निशात टेक्सटाईल्स मिल्स नावाने एक नावाने उद्योग सुरु केला. सध्या निशात समूह हा पाकिस्तानातील सर्वात मोठ कॉटन कपड्यांचा निर्यात करणारा समूह आहे. या समूहाने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली आहे. हा समूह ऊर्जा प्रकल्प, सिमेंट, बँक आणि विमा व्यवसायात पण अग्रेसर आहे. मंशा यांनी आतापर्यंत पंतप्रधान मदत निधीमध्ये 69 लाख रुपये जमा केले आहेत.