मुंबई : कोणत्याही कामासाठी सुरूवात करणे महत्वाचे असते मग वय कितीही असो वा बजेट कितीही असो केवळ जिद्द असायला हवी मग छोटी सुरूवातही मोठ्या गोष्टीची सुरूवात सुरू करते. ठाण्यात राहणाऱ्या मुळच्या लुधियानाच्या ( ludhiana ) कमलजीत कौर या 51 वर्षांच्या गृहीणीने आपल्या मेहनतीने किम्मूज् किचन ( kimmu’s kitchen ) हा ब्रॅंड लोकप्रिय केला आहे. किम्मूज् किचन देशी आणि नैसर्गिक संकरीत तूप तयार करते. साल 2020 मध्ये त्यांना कोरोना झाला आणि त्यातून त्यांना या बिझनेसची ( Business Idea ) आयडीया सूचल्याचे त्या म्हणतात.
कमलजीत कौर या एक सामान्य गृहीणीने शून्यातून आपला kimmu’s kitchen हा देशी शुद्ध सात्विक तुपाचा ब्रॅंड तयार केला आहे. त्यांना कोरोना झाला होता. तेव्हा त्यांची प्रतिकारक शक्ती खूपच खालावली होती. त्यांनी त्यावेळी खूपच विचार केला की आपण गावी लुधीयानात होतो. तेव्हा कधीच आजारी पडलो नाही. मग त्यांनी सात्विक तूप तयार करण्याचा निर्णय घेतला. ठाण्यात शुद्ध दूध मिळत नसल्याने त्यांनी गावी लुधियानला जाऊन शुद्ध तुप तयार करण्याचा निर्णय घेतला.
2020 मध्ये त्यांना कोरोना झाला होता. लग्नापूर्वी त्या कधी आजारी पडल्याचे त्यांना आठवत नाही. ठाण्यासारख्या शहरात लग्नानंतर दूध, दही आणि लोणी तूप सारखे तंदूरुस्ती वाढवणारे पदार्थांना लग्नानंतर आपण मुकलो म्हणूनच आपण आजारी पडलो असे त्यांच्या मनात आले. मग त्यांनी ठाणे सोडून गावी लुधीयानात त्यांनी दही पासून तुप बनविण्याची उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. ही प्रक्रीया थोडी वेळ खाऊ आहे. तीन महिने रिसर्च करून ‘किम्मूज् किचन’ kimmu’s kitchen ‘किम्मू कि रसोई’ चा जन्म झाल्याचे त्या सांगतात.
दूधाच्या मलईला गरम करून कडवून देशी घी बनविले जाते. परंतू बिलोना घी हे थेट दही पासून तयार केले जाते. आणि त्यास तयार करण्यासाठी अनेक तास लागतात. त्यामुळे त्याची किंमत देखील जास्त आहे. ठाण्याऐवजी त्यांनी लुधीयानात फॅक्टरी स्थापण्याचा निर्णय घेतला. कारण शुद्ध दुध मिळण्याची त्यांना खात्री नव्हती. आता लुधीयानातून मुंबई हे तुप बनवून आणले जाते.
कमलजीत म्हणतात कधी 100 हून अधिक तूपाच्या बाटल्यांच्या ऑर्डर मिळतात. तर कधी एकही मिळत नाही. कमलजीत यांची कंपनी 220, 500 आणि 1000 एमएलच्या बाटल्यांमध्ये तुप तयार करून विकतात. कमलजीत यांचा मुलगा हसरप्रीत याचा लुधीयाना येथे एक सेटअप होता. देशी घी तयार करण्यासाठी त्यात थोडाफार बदल केला. पहिल्या वर्षी 8 लाखाची गुंतवणूक केली आणि 20 लाखाचा फायदा झाला.