मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि उद्योगविश्वातील आदर्श व्यक्तीमत्व रतन टाटा यांची भेट झाली. या दोघांना या भेटीने जितका आनंद झाला. तितकाचा आनंद या दोघांच्या चाहत्यांना झाला. दोघांनी आपआपल्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. दोघांनी त्यांच्या क्षेत्रात नाव कमावले. ही भेट आपल्या कायम आठवणीत असेल, असे तेंडूलकर याने त्याच्या ट्विटर हँडलवर, एक्सवर लिहिले. त्याने या भेटीचे छायाचित्र पण अपलोड केली.
गेला रविवार माझ्यासाठी अविस्मरणीय
सचिन तेंडूलकर आणि रतन टाटा यांच्यामधील भेटीची सविस्तर माहिती समोर आली आहे. सचिन तेंडूलकर यांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. कारविषयीचे त्यांची माहिती, समाज कार्य आणि वन्यजीव संरक्षण सारख्या अनेक विषयावर दोघांमध्ये चर्चा झाली. ‘गेला रविवार आपल्यासाठी एकदम खास होता. कारण मला दिग्गज उद्योजक रतन टाटा यांच्याशी भेटून विविध विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली.’, असे तेंडूलकरने एक्सवर लिहिले.
आपली आवड, जीवनात किती आनंद आणू शकते?
‘अशी भेट, चर्चा अनमोल असते. एखादी आवड जीवनात किती आनंद आणू शकते. ही अशी भेट आहे, अशी वेळ आहे, असा क्षण आहे की आनंदाने त्याकडे पाहत राहिल.’ सचिन तेंडूलकर यांनी या भेटीचे खास वर्णन केले. जीवनात आनंदासाठी एक सारखी आवड, शौक असणे पण आवश्यक असल्याचे मत तेंडूलकरने मांडले. रतन टाटा यांनी फेब्रुवारी महिन्यात कुत्र्यांसाठी एक पशू रुग्णालय सुरु केले. पाळवी आणि भटक्या जनावरांवर तिथे उपचार होतात. हे एक प्रकारचं अनोखे पशू रुग्णालय आहे.
A Memorable Conversation.
Last Sunday was memorable, as I had the opportunity to spend time with Mr. Tata.
We shared stories and insights about our mutual love for automobiles, our commitment to giving back to society, passion for wildlife conservation, and affection for our… pic.twitter.com/a9n1KU1CgC
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 21, 2024
चाहत्यांना पण आनंद
रतन टाटा आणि सचिन तेंडूलकर यांच्यातील ही भेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. दोन दिग्गजांना एकाच फ्रेममध्ये चाहत्यांना पाहता आले. या दोघांना जसा या भेटीचा आनंद झाला. तसाच त्यांच्या चाहत्यांना पण आनंद झाला. सचिन तेंडूलकरने त्याच्या एक्स हँडलवर एक फोटो शेअर करत या भेटीची माहिती दिली आहे. त्यावर अनेकांनी कमेंटस करत दोन दिग्गज एकत्र आल्याचे म्हटले आहे.