Mothers Day 2023 : Anand Mahindra मातृदिनी भावूक! अन् आईला म्हणाले Thank You

| Updated on: May 14, 2023 | 8:30 PM

Mothers Day 2023 : 'यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे' आज मातृदिनी प्रत्येक जण आपल्या आईच्या आठवणीत हळवा, भावूक झाला आहे. तिच्या मायेची ऊब प्रत्येकाला जाणवत आहे.

Mothers Day 2023 : Anand Mahindra मातृदिनी भावूक! अन् आईला म्हणाले Thank You
Follow us on

नवी दिल्ली : ‘यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे’ आज मातृदिनी (Mothers Day 2023) प्रत्येक जण आपल्या आईच्या आठवणीत हळवा, भावूक झाला आहे. तिच्या मायेची ऊब प्रत्येकाला जाणवत आहे. महिंद्रा ॲंड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) समाज माध्यमावर सतत सक्रिय असतात. ते सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर म्हणून ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर त्यांचे 10.5 दशलक्षांहून अधिक फॉलोअर आहेत. आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यावर काही वेळातच ती जोरदार व्हायरल होते. त्यांचे अनेक ट्विट लोकप्रिय आहेत.

मदर्ड डे
रविवारी जगभरात मदर्स डे साजरा करण्यात येत आहे. प्रत्येकाला आज त्याच्या आईची आठवण सतावत आहेत. तर काही जणांनी आईसोबतचे फोटो शेअर करत मदर्स डे साजरा केला आहे. आज सोशल मीडियावर भावनोत्सव सुरु आहे. आईच्या त्यांच्या आयुष्यातील स्थान त्यांनी अधोरेखित केले. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मदर्स डेच्या निमित्ताने त्यांच्या आईच्या आठवणींना सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले महिंद्रा
आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया साईट ट्विटरवर रविवारी एक पोस्ट टाकली. ती लागलीच व्हायरल झाली. त्यांनी लिहिलंय की, ‘प्रत्येक मदर्स डेला मी आपल्या आईचा जुना फोटो शोधतात. यावर्षी पण मला आईचा जुना फोटो मिळाला. त्यावेळी माझी आई इंदिरा महिंद्रा या मला घेऊन महिंद्राच्या स्टीलच्या शेअरधारकांच्या वार्षिक बैठकीत पहिल्यांदा घेऊन गेली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माझे वडिल हरिश महिंद्रा होते.’

आईला म्हणाले धन्यवाद
आईने व्यावसायिक धडे गिरवायला दिले, त्यामुळे त्यांनी आईचे आभार मानले. तीला त्यांनी धन्यवाद म्हटले. आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, त्यांच्या आईने त्यांना लहानपणापासूनच व्यवसाया चालविण्याचे, कारभाराचे धडे दिले. त्यामुळेच ते आज एक यशस्वी उद्योजक आहेत.

Anand Mahindra झाले भावूक
मातृदिनी Anand Mahindra भावूक झाले. “आठवणीच्या पिटाऱ्यातून मी आईचा एक जुना फोटो आणला आहे.” असे म्हणत त्यांनी आईचा जुना फोटो शेअर केला. यापूर्वी ही त्यांनी आई एक शिक्षका असल्याची माहिती दिली होती.

2020 मध्ये महिंद्रा ग्रुपचे चेअरमन Anand Mahindra यांनी आई इंदिरा महिंद्रा यांचा एक फोटो ट्विट केला होता. हा फोटो आई गर्भवती असतानाचा होता. त्यात त्यांनी लिहिले की, मी आईच्या पोटात होतो. आईला धन्यवाद देण्याचा यापेक्षा दुसरा कोणता चांगला पर्याय असू शकतो, असे हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले होते.