नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : भारत आणि कॅनडामध्ये (India-Canda Crisis) सध्या वाद टोकाला पोहचला आहे. रोज दोन्ही देशांमध्ये शाब्दिक चकमक झडत आहे. या वादात आता आनंद महिंद्रा यांनी पण उडी घेतली आहे. महिंद्रा आणि महिंद्राने गुरुवारी कॅनडाला जोरदार झटका दिला. कॅनडातील कंपनीचे सर्व कामकाज तातडीने थांबविण्यात आले. या घडामोडींची माहिती कंपनीने दिली. कॅनडातील कंपनी बंद करण्याच्या निर्णयाची बाजारात चर्चा झाली. आज शेअर बाजारातील घसरणीचा फटका बसला. कंपनीचा शेअर 3 टक्क्यांनी घसरला. बाजार बंद होताना हा शेअर घसरणीसह 1584 रुपयांवर व्यापार करत होता. समाज माध्यमांवर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्या निर्णयावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यांच्या धाडसाचे कौतूक केले.
कामकाज थांबवले
महिंद्रा अँड महिंद्राने गुरुवारी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, कॅनडातील रेसन एअरोस्पेस कंपनीतील त्यांचे ऑपरेशन्स थांबविण्यात आले. कामकाज बंद करण्यात आले. या कंपनीत महिंद्रांची 11.18 टक्के वाटा आहे. कंपनीने स्वतःहून कामकाज थांबविण्यासाठी अर्ज केला. त्यामुळे कॅनडात एकच खळबळ उडाली. दोन्ही देशातील वादाचा हा परिणाम दिसून आला.
महिंद्रा अँड महिंद्राचे वक्तव्य काय
महिंद्रा अँड महिंद्राने शेअर बाजाराला या घडामोडींची माहिती दिली. 20 सप्टेंबर 2023 रोजीपासून कॅनडातील कामकाज बंद केले आहे. त्यासाठी मंजूरीचे आवश्यक कागदपत्रे मिळाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. रेसन कंपनीतील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या कंपनीसोबत कॅनडात सध्या कोणतेचे कामकाज होत नाही.
कंपनीचे शेअर्समध्ये घसरण
हे वृत्त हाती येताच महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये पडझड झाली. बाजार बंद होण्याच्या 10 मिनिटांपूर्वीच कंपनीच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची घसरण आली. हा शेअर 1584 रुपयांवर व्यापार करत होता. बाजारातील सत्रात कंपनीचा शेअर साडेतीन टक्क्यांनी घसरला. तो दिवसभराच्या 1575.75 रुपये निच्चांकावर पण पोहचला. एक दिवसाअगोदर कंपनीचा शेअर 1634.05 रुपयांवर बंद झाला होता.
महिंद्रा अँड महिंद्राला मोठे नुकसान
कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याने कंपनीचे बाजारातील मूल्य घसरले. त्यात 7200 कोटी रुपयांहून अधिकची घसरण दिसून आली. आकड्यानुसार, एक दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 1634.05 रुपयांवर होता. तर कंपनीचे भांडवल 2,03,025.78 कोटी रुपये होते. आता कंपनीचा शेअर 1575.75 रुपयांच्या निच्चांकावर पोहचला. कंपनीचे मार्केट कॅप 1,95,782.18 कोटी रुपयांवर आले. कंपनीला 7,243.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले.