Anant-Radhika Wedding : अनंत राधिकाचा शाही विवाह, लाडक्या लेकाच्या लग्नात किती केला खर्च ? मुकेश अंबानींची कमाई किती ?

| Updated on: Jul 19, 2024 | 2:53 PM

मुकेश अंबानी हे जगातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांच्या यादीत 11व्या स्थानावर आहेत. 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी उत्तम होतं. या वर्षात त्यांची एकूण संपत्ती आतापर्यंत 22.5 अब्ज डॉलरने वाढली आहे.

Anant-Radhika Wedding : अनंत राधिकाचा शाही विवाह, लाडक्या लेकाच्या लग्नात किती केला खर्च ?  मुकेश अंबानींची कमाई किती ?
Image Credit source: social media
Follow us on

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे नुकतेच राधिका मर्चंटशी लग्न झालं. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेले प्री-वेडिंग फंक्शन,क्रूझ पार्टी आणि आठवडाभर सुरू असलेलं लग्न संपूर्ण देशान नव्हे जगाने एन्जॉय केले. सोशल मीडियावरही सर्वत्र याच लग्नाची चर्चा होती, फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले. 12 जुलै रोजी अनंतने राधिका मर्चंटसोबत सप्तपदी घेतली आणि त्यांचं लग्न संपन्न झालं. त्याानतर अँटिलिया आणि जामनगरच्या घरात राधिका मर्चंटचा गृहप्रवेशही झाला.

अंबानी कुटुंबाचा हा शानदार हा विवाह सुरुवातीपासूनच जगभरात चर्चेचा विषय बनला होता. मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाच्या शाही लग्नात प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे. चला जाणून घेऊया मुकेश अंबानींची कमाई आणि अनंत-राधिकाच्या लग्नात झालेला खर्च किती ?

12 जुलैला झालं अनंत-राधिकाचं लग्न

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा विवाहसोहळ्याआधीची फंक्शन्स नेक महीने सुरू होती. दीड वर्षापूर्वी दोघांची राजस्थानच्या नाथद्वारामध्ये एंगेजमेंट झाली आणि अखेर या महिन्यात, 12 जुलै 2024 रोजी मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत-राधिकाचे लग्न झाले. अंबानी कुटुंबाच्या या लग्नासाठी फक्त देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही विविध मान्यवर, सेलिब्रिटी हजर होते. विवाह सोहळ्याची राजेशाही व्यवस्था पाहून सर्वजण चकित आणि इंप्रेसही झाले. प्री-वेडिंग सोहळा ते लग्नपत्रिका किंवा इटलीतील क्रूझ पार्टीपासून ते मुंबईतील लग्नापर्यंत आणि पाहुण्यांना वाटण्यात आलेल्या करोडोंच्या भेटवस्तूंसाठी मुकेश अंबानींनी पाण्यासारखा पैसा खर्च केला.

 

लाखोंची लग्नपत्रिका आणि कोट्यवधींची गिफ्ट्स

शंकराचार्य, जगद्गुरू यांच्यासह सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीत अनंत आणि राधिकाचा विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला. या मेगा वेडिंगच्या भव्यतेने सर्वांना आकर्षित केले. विशेष म्हणजे या लग्नात संस्कार आणि संस्कृतीचा संगम पाहायला मिळाला. एकीकडे अनंत-राधिकाच्या वेडिंग कार्डची किंमत लाखोंमध्ये असतानाच दुसरीकडे त्यांच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या रिहानावर जवळपास 74 कोटी रुपये खर्च करण्यात आले.तर संगीत सोहळ्यासाठी आलेल्या जस्टिन बिबरला 84 कोटी रुपये देण्यात आले. इतकेच नाही तर अंबानींच्या खास पाहुण्यांना भेट दिलेल्या प्रत्येक ऑडमार्ड पिगेट घड्याळाची किंमत सुमारे 2 कोटी रुपये होती.

अनंत-राधिकाच्या लग्नासाठी किती झाला खर्च ?

रिपोर्ट्स नुसार, मुकेश अंबानी यांनी अनंत-राधिकाच्या लग्नासाठी सुमारे 5,000 कोटी रुपये खर्च केले. मात्र, कोणी त्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. पण, एवढा खर्च झाला असला तरी तो मुकेश अंबानींच्या कमाईचा एक छोटासा भाग आहे. गेल्या 10 दिवसांत मुकेश अंबानींच्या संपत्तीत 3 अब्ज डॉलर्स किंवा सुमारे 25,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, यावरून त्यांच्या कमाईचा अंदाज लावता येतो. 5 जुलै रोजी त्यांची संपत्ती 118 अब्ज डॉलर्स होती, जी वाढून 121 अब्ज डॉलर्स झाली आहे.

 

या वर्षी एकूण संपत्ती 1.88 लाख कोटींनी वाढली

मुकेश अंबानी हे केवळ भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत तर जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत (World’s Top-10 Billionaires List) ते 11 व्या स्थानावर आहेत. 2024 हे वर्ष मुकेश अंबानींसाठी शानदार ठरलं आहे. एकीकडे अंबानी कुटुंबातील लेकाचं लग्न झालं तर तर दुसरीकडे रिलायन्सचे चेअरमन असलेल्या मुकेश अंबानी यांनी प्रचंड नफा कमावला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत 22.5 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, भारतीय चलनानुसार ती 1.88 लाख कोटी रुपये आहे.