नवी दिल्ली: रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. एकीकडे राफेल विमान करारप्रकरणात अनिल अंबानी आरोपीच्या पिंजऱ्यात असताना, आता न्यायालयाच्या अवमानप्रकरणी त्यांना जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. एरिक्सन इंडियाच्या (Ericsson India) याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court ) अनिल अंबानींना अवमानप्रकरणी दोषी धरलं आहे. अनिल अंबानींसह कोर्टाने कंपनीच्या दोन संचालकांनाही दोषी धरलं.
इतकंच नाहीतर कोर्टाने अनिल अंबानींना कडक शब्दात एरिक्सन इंडियाला चार आठवड्यात 453 कोटी रुपये देण्यास बजावलं आहे. जर हे पैसे दिले नाहीत तर तिघांनाही तीन तीन महिने जेलमध्ये जावं लागेल, असं सुप्रीम कोर्टाने बजावलं.
कोर्टाने तिघांनाही आदेशाच्या अवमानप्रकरणी 1-1 कोटींचा दंडही ठोठावला. टेलिकॉम उपकरण निर्माता कंपनी एरिक्सनची थकबाकी न दिल्याने या कंपनीने रिलायन्सविरोधात न्यायालायात धाव घेतली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने अनिल अंबानींना दणका देत चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
Supreme Court says Anil Ambani & 2 directors have to pay Rs 453 Cr to Ericsson India within 4 weeks & if they fail to pay the amount, three months’ jail term will follow. SC also imposed a fine of Rs 1 cr each on them, if not deposited within a month, 1-month jail will be awarded https://t.co/5PG6OsD2j3
— ANI (@ANI) February 20, 2019
काय आहे एरिक्सनचा आरोप?
रिलायन्सकडे राफेल विमान करारात गुंतवण्यास पैसे आहेत, मात्र आमचे थकीत 550 कोटी देण्यास पैसे नाहीत, असा आरोप एरिक्सन इंडियाने केला. मात्र अनिल अंबानींच्या रिलायन्सने हा आरोप फेटाळला. त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज कोर्टाने 4 आठवड्यात पैसे देण्यास बजावलं आहे.
अनिल अंबानींच्या कंपनीचा दावा काय?
अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या दाव्यानुसार, “मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओसोबत भागांच्या विक्री व्यवहारात, त्यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली. मात्र एरिक्सन इंडियाचे पैसे परत करण्यासाठी आमची कंपनी शक्य ते सर्व प्रयत्न केला, मात्र अद्याप यश आलं नाही”