या कंपनीची चालली जादू, 10 दिवसांत अनिल अंबानी यांना करणार कर्जमुक्त

| Updated on: Mar 20, 2024 | 11:12 AM

Anil Ambani | अनिल अंबानी यांना अच्छे दिन येत असल्याचे संकेत मिळत आहे. त्यांचे दिवस पालटत असल्याचे संकेत मिळत आहे. त्यांनी तीन बँकांचे कर्ज फेडल्याचे समोर आले आहे. आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक आणि डीबीएस बँकेने जवळपास 400 कोटी रुपयांचे कर्ज त्यांच्या डोई होते.

या कंपनीची चालली जादू, 10 दिवसांत अनिल अंबानी यांना करणार कर्जमुक्त
Follow us on

नवी दिल्ली | 20 March 2024 : गेल्या काही वर्षांपासून मुकेश अंबानी यांची संपत्ती कित्येक पटीने वधारली आहे. ते आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. तर दुसरीकडे त्यांचा लहान भाऊ अनिल अंबानी यांची परिस्थितीत खालावत गेली. अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले. पण काळ पालटत असताना दिसत आहे. अनिल अंबानी यांनी रिलायन्स पॉवरने आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक आणि डीबीएस बँकचे कर्ज चुकते केले आहे. तर मुख्य कंपनी रिलायन्स इन्फास्ट्रक्चर, जेसी फ्लावर्स एसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीचा 2100 कोटींची थकबाकी फेडण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे हे कर्ज याच आर्थिक वर्षात फेडण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.

आता केवळ ही कर्ज फेड बाकी

ईटीच्या वृत्तानुसार, रिलायन्स पॉवर कंपनीवर सध्या केवळ आयडीबीआय बँकेचे कॅपिटल कर्ज बाकी आहे. आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक आणि डीबीएस बँकेने जवळपास 400 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यातील मोठी रक्कम वसूल करण्यात या बँकांना यश आले आहे.

हे सुद्धा वाचा

शेअर वधारले

कर्ज फेडीची वार्ता धडकताच शेअर बाजारात रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. बीएसईवर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर गेल्या पाच दिवसांत 10.5 टक्क्यांनी वधारले. या शेअरने गेल्या 6 महिन्यात 38 टक्क्यांचा फायदा करुन दिला. रिलायन्स पॉवरचा शेअर गेल्या पाच दिवसांत 8.10 टक्के आणि 6 महिन्यात 19 टक्के तेजी दिसून आला.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर-जेसी फ्लॉवर्समध्ये करार

  • 7 जानेवारी रोजी एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि जेसी फ्लॉवर्स एआरसीमध्ये एक करार झाला. त्यानुसार, कर्ज चुकविण्यासाठी अधिक कालावधी मिळाला. स्टँडस्टिल करारानुसार, जेसी फ्लॉवर्स एआरसी 31 मार्चपर्यंत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करत नाही. त्यामुळे या कंपनीला निधी जमा करण्यासाठी वेळ मिळाला.
  • स्टॉक एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स पॉवरने 13 मार्च रोजीपर्यत व्हीएफएसआय होल्डिंग्सकडून 240 कोटी रुपयांचा इक्विटी फंड जमा केला. त्यापैशांचा वापर बँकांचे कर्ज चुकते करण्यासाठी वापरण्यात येत आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.