नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्यापासून 13-14 जुलैपासून फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पण त्यापूर्वीच एका बातमीने झटका दिला आहे. अनिल अंबानी (Anil Ambani) यांची डिफेन्स सेक्टरमधील कंपनी पण दिवाळखोरीत निघाली आहे. यापूर्वीच अनिल अंबानी यांनी दिवाळखोरीची घोषणा केलेली आहे. त्यांच्या इतर अनेक कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत. तर काही या प्रक्रियेत आहेत. आता अहमदाबाद येथील एनसीएलटी न्यायाधीकरणाने डिफेन्स सेक्टरमधील कंपनीच्या दिवाळीखोरीचा (Defense Sector Company Bankrupt) मार्ग मोकळा केला आहे. याच कंपनीच्या माध्यमातून भारतात फ्रान्सचे फायटर जेट राफेल (Rafael Deal) दाखल झाले होते. त्यामुळे एकूणच या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे तर विरोधकांना केंद्र सरकारविरोधात आयतं कोलीत मिळालं आहे.
Rafael M ची खरेदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात अनेक करार होण्याची शक्यता आहे. सध्या फ्रान्स निर्वासीतांच्या दंगलीप्रकरणात गुरफटलेला आहे. त्याचवेळी हा दौरा होत आहे. या दौऱ्यात पंतप्रधान संरक्षण क्षेत्रातील मोठा करार करण्याची शक्यता आहे. ते नौसेनेसाठी राफेल एमची खरेदी करु शकतात.
पाच वर्षांपूर्वी झाली घडामोड
तर पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडने राफेल जेट तयारी करणाारी कंपनी डसॉ एव्हिशनसोबत करार केला होता. त्यातंर्गत भारतीय वायुसेनेसाठी 36 राफेल जेट फायटरची खरेदी झाली होती.
विरोधकांनी केला होता हल्लाबोल
अनिल अंबानी यांच्या उद्योगाला घरघर लागलेली होती. अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होत्या. त्यामुळे अनिल अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट देण्याचा हा प्रकार विरोधकांना रुचला नाही. त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला होता. हा करार 30 हजार कोटी रुपयांचा होता. त्यानंतर राफेलच्या अपघातानंतर पण प्रश्न उठविण्यात आले होते.
अशी घडली घडामोड