Niraj Bajaj : दर्या किनारी एक बंगलो गं! मुंबईत सर्वाधिक महागड्या घराचा अजून एक सौदा, उद्योगपतीने खरेदी केले समुद्रकिनारी पेंटहाऊस

| Updated on: Mar 15, 2023 | 8:57 PM

Niraj Bajaj : मुंबईत आलिशान बंगल्याच्या कोट्यवधींच्या डील काही नवीन नाहीत. पण या डीलचे आकडे अनेकांचे डोळे पांढेर करायला लावणारे आहेत. आता मुंबईत आणखी एक कोट्यवधींची रिअल इस्टेटची डील झाली आहे.

Niraj Bajaj : दर्या किनारी एक बंगलो गं! मुंबईत सर्वाधिक महागड्या घराचा अजून एक सौदा, उद्योगपतीने खरेदी केले समुद्रकिनारी पेंटहाऊस
Follow us on

नवी दिल्ली : मायानगरी मुंबापुरीत (Mumbai) अजून एका आलिशान, कोट्यवधी रुपयांच्या घराचा सौदा झाला. यापूर्वी मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलियाची चर्चा होती. त्यानंतर त्यांची मुलगी ईशा अंबानी हिच्या सासऱ्याने तिला भेट म्हणून दिलेल्या आलिशान घराची (Luxurious Bunglow) चर्चा रंगली. मुंबईतील जागेच्या किंमती सर्वसामान्यांच्या स्वप्नापलिकडे आहेत. क्रीम एरियातील आलिशान घराची किंमत डोळे पांढरी करणारी आहे. आता पुन्हा एक मोठी रिअल इस्टेट डील झाली आहे. बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज (Niraj Bajaj) यांनी हे आलिशान घर खरेदी केले आहे. या किंमतीत एखादे छोटे टुमदार गाव उभे राहू शकते.

बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी मुंबईतील समुद्र किनारी हे आलिशान ट्रिप्लेक्स पेंटहाऊस खरेदी केले आहे. या घराची किंमत 252.5 कोटी रुपये आहे. यापूर्वी मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या आलिशान घराची चर्चा होती. तर उद्योगपती बी. के. गोयनका आणि राधाकिशन दमानी यांच्या महागड्या घराची पण चर्चा रंगली होती.

नीरज बजाज यांनी हे पेंटहाऊन गेल्या वर्षी 13 मार्च 2023 रोजी खरेदी केले आहे. मालाबार हिल परिसरात ही इमारत आहे. अद्याप या इमारतीचे काम पूर्ण व्हायचे आहे. या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. 2026 पर्यंत ही इमारत बांधून पूर्ण होणार आहे. इंडेक्सटॅप.कॉम नुसार, बजाज यांनी 31 मजिली असलेल्या लोढा मलाबार पॅलेसमध्ये हे ट्रिप्लेक्स पेंटहाऊस खरेदी केले आहे. हे आलिशान घर 29,30 आणि 31 व्या मजल्यावर आहे. 2023 मधील महागड्या डीलपैकी ही तिसरी सर्वात महागडी डील आहे.

हे सुद्धा वाचा

फेब्रुवारीत मुंबईतील वरळी भागात यापूर्वी महागडा करार झाला होता. थ्री सिक्सटी वेस्टमध्ये 30 हजार चौरस फुट परिसरातील पेंट हाऊस खरेदी करण्यात आला. उद्योगपती बी. के. गोयनका यांनी हे पेंटहाऊस खरेदी केले. वेलस्पन समूहाचे चेअरमन गोयनका यांनी हे महागडे घर खरेदी केले आहे. 230 कोटी रुपयांना हा करार झाला. यापूर्वी डी-मार्टचे चेअरमन राधाकृष्ण दमानी यांनी जवळपास 1,238 कोटी रुपये खर्चून मुंबईत 28 आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहेत.

ईशा अंबानी आणि तिचे पती आनंद पिरामल यांना लग्नाची भेट म्हणून हा 452 कोटी रुपयांचा आलिशान बंगला देण्यात आला. ईशाचे सासरे अजय पिरामल यांनी हा बंगला भेट म्हणून दिला आहे. मुकेश अंबानी यांचा बंगला ॲंटिलिया हा जगातील काही महागड्या घरांपैकी एक आहे. तर ईशा अंबानी हिचा आलिशान बंगला हा 3 D तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा महल 11 मीटर उंच आणि 50000 वर्ग फुटावर पसरलेला आहे.