शांघाईमधील हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने जगातील सर्वाधीक अब्जाधीश राहत असलेल्या शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीत (Harun Global Rich List 2024) पहिल्या क्रमांकावर अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहराचा पहिला क्रमांक लागतो. येथे 119 अब्जाधीश राहतात. दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटिशांची राजधानी असलेल्या लंडनचा क्रमांक लागतो. या शहरात 97 अब्जाधीश वास्तव्याला आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर उलटफेर झाला आहे. चीनमधील बीजिंग या शहराकडून तिसरा क्रमांक भारतातील मुंबईने खेचून आणला आहे. आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर बीजिंगचा डौल कायम होता. मुंबईने 92 अब्जाधीशांसह बीजिंगकडून मुकूट हिसकावला. आता लवकरच लंडनही मागे पडणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. मग बीजिंगमध्ये किती अब्जाधीश आहेत?
मुंबईने बीजिंगला टाकले मागे
शांघाई 87 अब्जाधीशांसह या यादीत 5 व्या क्रमांकावर आहे. तर सहाव्या क्रमांकावर शेन्जेन हे शहर आहे. येथे 84 अब्जाधीश आहेत. 7 व्या स्थानावर हाँगकाँग शहर आहे. येथे 65 अब्जाधीशांचे वास्तव्य आहे. मुंबईने पहिल्यांदाच या यादीत आघाडी घेतली आहे. अब्जाधीशांच्या शहराचा मान पटकावला आहे. बीजिंगमध्ये अब्जाधीशांची संख्या 91 इतकी आहे. तर चीनमध्ये एकूण 814 अब्जाधीश आहेत. तर मुंबईत 92 अब्जाधीश आहेत. भारतात या घडीला 271 अब्जाधीश आहेत.
ही आहेत कारणं
अंबानी-अदानी हे दिग्गज मुंबईत