नवी दिल्ली | 17 February 2024 : Apaar Card हे देशातील विद्यार्थ्याची ओळख असेल. देशातील विद्यार्थ्यांसाठी एकच अभ्यासक्रमाची चर्चा सुरु आहे. त्यातच ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’, या महत्वकांक्षी योजनेचा श्रीगणेशा झाला आहे. Apaar Card हे विद्यार्थ्यांचे Aadhaar Card आहे. देशात आतापर्यंत 25 कोटी अपार कार्डचे वाटप करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली. येत्या काळात विद्यार्थ्यांना हे कार्ड विविध शाळेतील प्रवेशापासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरणार आहे. हे कार्ड कुठे आणि कसे तयार होणार आहे, त्याचा फायदा काय असे प्रश्न अनेकांना पडले आहेत, जाणून घ्या त्याची माहिती…
अपार संबंधी राष्ट्रीय परिषद
नवी दिल्लीत नुकतीच अपार कार्डविषयी राष्ट्रीय परिषद झाली. यावेळी येणाऱ्या अडचणी तसेच ही योजना राबविण्याविषयी, शिक्षकांसह इतरांच्या प्रशिक्षणाविषयी ऊहापोह झाला. राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत (NEP) 2020 ही योजना समोर आणण्यात आली आहे. हा एक प्रकारे शैक्षणिक, क्रीडाविषयीचा विद्यार्थ्याचा बायोडाटा आहे.
काय आहे Apaar Card
‘अपार कार्ड’ मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती डिजिटल जतन करण्यात येईल. या कार्डमध्ये विद्यार्थ्याची सर्व शैक्षणिक, क्रीडा आणि शिष्यवृत्तीबाबतची माहिती जमा होईल. विद्यार्थ्याने कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला कोणती बक्षिसं मिळाली, प्रमाणपत्र मिळाली. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता याची माहिती अपार कार्डमध्ये असेल. विद्यार्थ्याची शाळा बदलली तरी हा रेकॉर्ड कायम असेल. ही माहिती प्रत्येक शाळेत अपडेट करण्यात येईल.
अशी होईल विद्यार्थ्याची नोंदणी
ऑनलाईन रजिस्ट्रेशन
अपार कार्ड तयार करण्यासाठी चिंता करण्याची गरज नाही. हे कार्ड तयार करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी कुठेही धक्के खाण्याची, लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही.