नवी दिल्ली | 16 February 2024 : 1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेटमध्ये सौरऊर्जा योजनेची घोषणा केली होती. पीएम सूर्योदय योजनेची (PM Suryoday Yojana) घोषणा करण्यात आली होती. त्यातंर्गत ग्राहक त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावल्यास 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. त्यातून त्यांना वार्षिक 18,000 रुपयांचा फायदा होणार आहे. पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा 22 जानेवारी रोजी केली होती. सरकारने या मोफत इलेक्ट्रिसिटी योजनेला पीएम सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana) असे नाव देण्यात आले आहे. या योजनेत कसा अर्ज करावा, त्यासाठी काय प्रक्रिया आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. जाणून घ्या, काय आहे ही योजना?
मिळणार सबसिडी
या नागरिकांना योजनेचा फायदा
सूर्योदय योजनेतंर्गत सरकार एक कोटी घरांवर सौर ऊर्जेसाठी पॅनल बसवणार आहे. त्यासाठी बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. सोलर पॅनलच्या मदतीने मोफत वीज मिळेल. ज्यांच्या घरावरील छतावर सोलर पॅनल बसविता येणार आहे, त्या कुटुंबांना या योजनेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे. ही योजना गरीब आणि मध्यमवर्गासाठी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना फायदा होईल.
कोणाला करता येईल अर्ज
असा करा अर्ज