गौतम अदानी, सागर अदानीविरोधात अटक वॉरंट; लाचखोरी, फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट

| Updated on: Nov 21, 2024 | 3:00 PM

Gautam Adani America Arrest Warrant : अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी मोठ्या अडचणीत अडकले आहेत. त्यांना अमेरिकेत लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात फटका बसला आहे. अमेरिकेमधील कोर्टाने त्यांच्याविरोधात खटला दाखल करुन घेतला आहे. त्यांच्यासह पुतण्या सागर अदानी यांना अटक वॉरंट बजावले आहे.

गौतम अदानी, सागर अदानीविरोधात अटक वॉरंट; लाचखोरी, फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
गौतम अदानी
Follow us on

अदानी समूहाचे चेअरमन आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी अमेरिकेतून वाईट बातमी येऊन ठेपली आहे. अदानी, त्यांचा पुतण्या सागर यांच्यासह सात जणांवर अमेरिकेत अब्जावधी डॉलरच्या लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात आरोप लावण्यात आले आहेत. याप्रकरणात अमेरिकेतली कोर्टात सुनावणी झाली. अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे आता अदानी समूहाने अमेरिकेतमधील 506925 कोटी 44 लाखांचा ( 600 दशलक्ष डॉलर) बाँड रद्द केला आहे.

काय आहे प्रकरण?

अदानी ग्रीन एनर्जी या वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रातील भारतीय कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कॅनडा येथील संस्थागत गुंतवणूकदाराशी भागीदारी केली आणि भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे सरकारी संस्थांसाठी भागीदारीचा करार करण्याचे ठरले. या कराराच्या आडून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून निधी जमा करण्याचा प्रयत्न झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी, विनीत एस. जैन, रणजीत गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल यांच्यावर लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांचा रोल काय?

आता या प्रकरणात थेट डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका असल्याचा पण दावा करण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदी विजय मिळवल्यानंतर गौतम अदानी यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, अदानी यांनी गुंतवणुकीची घोषणा करताना ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर यापूर्वीच ट्रम्प यांनी ऊर्जा कंपन्यांचे किचकट नियम शिथिल वा सुटसुटीत करण्याचे आश्वासन दिले आहे.

भाजप-काँग्रेस आमने-सामने

या प्रकरणात आता भारतात काँग्रेस आणि भाजपा आमनेसामने आले आहेत. राहुल गांधी यांनी अदानी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे हे प्रकरण काँग्रेसशासित राज्याशी संबंधित असल्याचा दावा भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. आरोप करण्यापेक्षा गांधींनी चौकशी करावी असा टोला त्यांनी लगावला.