मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचा (Elon Musk Buys Twitter) ताबा घेतला आहे. सोमवारी रात्री उशिरा या करारावर (Twitter Deal) शिक्कामोर्तब करण्यात आला. या करारामुळे जागतिक बाजारपेठेत ट्विटरचे शेअर्स चढले असताना क्रिप्टो मार्केटमध्येही त्याचा मोठा परिणाम दिसून आला आहे. विशेष म्हणजे मस्कने ट्विटर विकत घेण्याची ऑफर स्वीकारल्याच्या वृत्तानंतर एका व्यक्तीने ‘एलॉन बाय ट्विटर’ नावाचे क्रिप्टो क्वईन लॉन्च केले आहे. हे एका क्षणात गगणाला भिडले. एका अहवालानुसार, ट्विटरच्या विक्रीच्या वृत्तानंतर ‘एलॉन बाय ट्विटर’ (Elon buy twitter) नाण्याची किंमत लगेचच वाढली आणि काही तासांतच त्याची किंमत 7 हजार टक्क्यांवर गेली. हे नाणे खरेदी करण्यासाठी क्रिप्टो (Cryptocurrency) गुंतवणूकदारांमध्ये स्पर्धा होती. त्यामुळे याविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, हा घोटाळा तर नाही ना, यावरही सध्या चर्चा रंगली आहे.
‘एलन बाय ट्विटर’ नाण्याची किंमत क्षणार्धात गगनाला भिडलेली असताना टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या आवडत्या क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइनची किंमतही हा करार पूर्ण झाल्यानंतर गगनाला भिडली. क्रिप्टो मार्केटमध्ये डॉजकॉइन 20.89 टक्क्यांच्या वाढीसह 12.62 रुपयांवर व्यवहार करत होते. गेल्या 24 तासांत त्याची किंमत 2.18 रुपयांनी वाढली आहे. मात्र, किंमतीत आता बदल झाला आहे. विशेष म्हणजे, ट्विटरच्या विक्रीच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, क्रिप्टो बाजारातील टॉप-10 क्रिप्टोकरन्सीच्या किंमती वाढल्या. तर इतर डिजिटल चलने देखील हिरव्या चिन्हावर व्यवहार करताना दिसल्या. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन बद्दल बोलायचे तर ते 2.77 टक्के किंवा 87 हजार 841 रुपयांनी वाढून 32 लाख 54 हजार 789 रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, इथरियम ही दुसरी सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी 3.81 टक्के किंवा 8 हजार 837 रुपये वाढली आणि त्याची किंमत 2 लाख 41 हजार 018 रुपये झाली आहे.
ट्विटरची इक्विटी खरेदी करण्यासाठी 21 अब्ज डॉलर रोख देणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. पण आता उरलेले पैसे तो कुठे घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार त्यांची एकूण संपत्ती 257 अब्ज डॉलर इतकी आहे यात शंका नाही. पण ब्लूमबर्गचा अंदाज आहे की मस्ककडे केवळ 3 अब्ज डॉलर्सची रोकड आणि काही विक्री योग्य मालमत्ता आहेत. दरम्यान, ‘एलॉन बाय ट्विटर’ नावाचे क्रिप्टो कॉईन लॉन्च केले आहे. हे एका क्षणात गगणाला भिडले असले तरी याकडे घोटाळ्याच्या नजरेतूनही तज्ज्ञ पाहतायेत.
इतर बातम्या
Online Payment : QR कोडने व्यवहार करत असाल तर सावधान, काही ‘चुकां’ मुळे तुमचे खाते होऊ शकते रिकामे !