नवी दिल्ली : एखादा उद्योग सुरू करण्यासाठी लाखो रूपायांची गरज नसते. तुमची कल्पना जर खूप चांगली असेल तर कमी पैशातही तुम्ही गगनभरारी घेऊ शकता. आजचे अनेक प्रसिद्ध उद्योगपती यांनी त्यांचा बिझनेस अत्यंत कमी भांडवलात सुरू केला होता. अशाच एका उद्योजकाने आपला पहिला स्टार्टअप केवळ आठ हजार रूपायांत सुरू केला होता, हे जर तुम्हाला सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. अश्नीर ग्रोव्हर ( ASHNEER GROVER ) यांचे पार्टनर आणि थर्ड युनिकॉर्नचे ( Third Unicorn ) संस्थापक असीम घावेरी ( ASEEM GHAVRI ) यांची कहानी आपण ऐकणार आहोत.
असीम घावेरी यांनी आपला पहिला स्टार्टअप कॉलेजच्या जमान्यात पॉकेटमनीतून वाचविलेल्या आठ हजार रूपयात २००९ मध्ये सुरू केला होता असे लिंक्डइन ( linkedin ) वर लिहिले आहे. या निर्णयात अनेक अडचणींचा सामनाही करावा लागल्याचे ते म्हणतात. त्यानंतर लागोपाठ नवनवीन आयडीयावर त्यांनी काम केले. आणि भारतपे ला पुढे आणण्यासाठी मदत केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नवउद्ममींसाठी अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
असा सुरू केला पहिला बिझनेस
असीम घावेरी यांनी लहानपणीच व्यवसाय करायचा हे निश्चित केले होते. परंतू व्यवसायाची सुरूवात कशी करायची हा प्रश्न होता. सणासुदीला नातेवाईकांनी दिलेले आणि पॉकेटमनी मिळून आठ हजार रुपये त्यांच्याकडे होते. त्यांनी एके दिवशी क्वालिटी वाल्स आईस्क्रीमचे कार्ट पाहीले आणि त्यांना आयडीया सुचली. असाच एक हॉट फूड कार्ट तयार केला तर..आणि या आयडीयावर काम केले. काही फूड प्रोडक्ट्स चाखले. आणि हॉटडॉगचा पहिला कार्ट तयार केला. येथून हंग्री विले ( Hungry Ville ) च्या हॉट डॉगची सुरूवात झाली.
अनेक अडचणींचा सामना
व्यवसाय सुरु करताना अनेक अडचणी आल्या. पालिकेच्या गुंडांकडून धमकी मिळाली. पोलिसांचे दांडके खावे लागले आणि शेजारीपाजाऱ्यांचा त्रास तर वेगळाच. त्यांच्या शेजारची आंटी तर कुटुंबियांना काही पैशांची अडचण तर नाही ना असे विचारायला कार्टवर आली.
असीम यांच्याकडे कामगार ठेवण्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी स्वत: हॉट डॉग्स त्यांच्या कारपर्यंत जाऊन पोहचवले. इंजिनियरिंगचा विद्यार्थी कारमध्ये जेवण पोहचवत आहे हे पाहून कधी कधी आई-वडीलांना नातलगात वावरताना विचित्र वाटायचे. परंतू व्यवसाय वाढू लागला. पहिले दोन दिवस त्यांचे सारे हॉट डॉग्स संपले. दर महिन्याला व्यवसाय वाढू लागला. जो पैसा मिळेल त्यातून चंदीगडमध्ये आणखी कार्ट टाकले.
आपला इगो बाजूला ठेवा
थर्ड युनिकॉर्नचे को – फाऊंडर असलेल्या असीम यांनी धंदा करू इच्छीणाऱ्यांनी आपला ईगो बाजूला ठेवायला सांगितले. ग्राहकांना फूड सर्व्ह करताना आपल्याला कधी लाज वाटली नसल्याचे ते म्हणाले. नातेवाईकांनी शेजाऱ्यांनी नाउमेद केले तरी ते थांबले नाहीत, छोटीसी सुरुवात असेल तरी करावी पण कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे असा सल्ला त्यांनी नव उद्ममींना दिला आहे. असीम यांनी फूड कार्टनंतर टेक आयडीयावर काम केले. ई-कॉमर्स कंपनी सुरू केली आणि फिनटेक कंपनी भारतपे ला पुढे येण्यास मदत केली.