अवघ्या 16 वर्षीय मुलीची कमाल, स्टार्टअपने उभी केली 100 कोटीची कंपनी

| Updated on: Oct 14, 2023 | 4:05 PM

अवघ्या सोळा वर्षांची असताना एका भारतीय मुलीने कमाल केली आहे. तिच्या स्टार्टअपला यश येत तिने 100 कोटी मूल्य असलेल्या कंपनीची स्थापना केली आहे.

अवघ्या 16 वर्षीय मुलीची कमाल, स्टार्टअपने उभी केली 100 कोटीची कंपनी
Pranjali Awasthi
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : ज्या वयात आपण स्वत:चा निर्णय स्वत: घेण्यास देखील समर्थ नसतो. त्या सोळावं वर्ष धोक्याचं धोक्याचं म्हटलं जाणाऱ्या अडनिड्या वयात एका मुलीने 100 कोटी मुल्याची कंपनी उभी केली आहे. या भारतीय मुलीने Delv.AI या आर्टीफीशल इंटेलिजन्स ( कुत्रिम बुद्धीमत्ता ) AI कंपनीच्या माध्यमातून इतिहास घडविला आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनूसार प्रांजली अवस्थी हीने 2022 मध्ये Delv.AI या एआय कंपनीची सुरुवात केली.

Delv.AI या स्टार्टअप कंपनीचे मुल्य 100 कोटी रुपये ( 12 अब्ज डॉलर ) आहे. अलिकडेच मियामी टेक वीकमध्ये अनेकांना या कंपनीने प्रभावित केले आहे. 16 व्या वर्षांत कंपनीच्या प्रमुख असलेल्या प्रांजली अवस्थी हिच्याकडे 10 जणांची छोटी टीम आहे. या स्टार्टअपमध्ये पाऊल ठेवण्यासाठी तिला तिच्या वडीलांनी सुरुवातीला मदत केली. जेव्हा तिने कोडींग शिकायला सुरुवात केली तेव्हा ती केवळ सात वर्षांची होती. प्रांजली 11 वर्षांची असताना तिचे कुटुंब भारतातून फ्लोरीडा येथे स्थायिक झाले. त्यानंतर व्यवसायाचे नवे दालन खुले झाले.

फ्लोरीडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधन प्रयोगशाळेत इंटर्नशिप केल्यानंतर तिने व्यवसायात पाऊल टाकले. जेव्हा तिने इंनटर्नशिप सुरु केली तेव्हा ती 13 वर्षांची होती. याच काळात चॅटजीपीटी-3 बीटा हे एआय सॉफ्टवेअर बाजारात आले होते. त्याच वेळी तिच्या मनात Delv.AI सुरु करण्याचा विचार आला होता.

त्यानंतर प्रांजलीने मागे वळून पाहीले नाही

हायस्कूलमध्ये शिकताना प्रांजलीला बॅकएंड कॅपिटलचे लुसी गुओ आणि डेव्ह फोंटेनोटच्या लीडरशिपमध्ये मियामी येथे एक एआय स्टार्टअप एक्सेलेरेटर प्रोग्रॅममध्ये या बिझनेससाठी स्वीकारले गेले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिने Delv.AI ला प्रोडक्ट हंटवर लॉंच केले. एक्सेलेरेटर प्रोग्रॅमने प्रांजलीला ऑन डेक आणि व्हीलेज ग्लोबलमधून गुंतवणूक सुरक्षित करण्यास मदत केली. कंपनीने फंडींगमध्ये 4,50,000 डॉलर ( सुमारे 3.7 कोटी रु.) जमविले आणि आज कंपनीचे मूल्य बाजारात 100 कोटी रुपये इतके झाले आहे.