Virat Kohli च्या रेस्टॉरंटमध्ये खाल्ला भूट्टा, बिल इतकं आलं की सोशल मीडियावर निघाला जाळ, पहा नेमकं काय झालं

| Updated on: Jan 14, 2025 | 2:46 PM

सेलिब्रिटीची रेस्टॉरंट केवळ आपल्या मालकांच्या नावामुळे कायम चर्चेत असतात. तसेच तेथील डीशच्या किंमतीमुळे देखील त्यांना सोशल मीडियावर निगेटिव्ह प्रसिद्धी मिळते. केवळ रेस्टॉरंटच नव्हे तर विमानतळावरील रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या किंमती कायम चर्चेत असतात. यात आता Virat Kohli चे रेस्टॉरंट सामील झाले इतकेच...

Virat Kohli च्या रेस्टॉरंटमध्ये खाल्ला भूट्टा, बिल इतकं आलं की सोशल मीडियावर निघाला जाळ, पहा नेमकं काय झालं
Follow us on

टीम इंडियाचा कॅप्टन क्रिकेटर विराट कोहली हा प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. क्रिकेट आणि जाहिरातीतून इतकी कमाई होत आहे. त्याने आता रेस्टॉरंट चेनही उघडली आहे. विराट कोहलीने वन 8 कम्यून ( One8 Commune ) नावाची रेस्टॉरंटची चेन उघडली आहे. या संबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हैदराबाद येथे विराट कोहली याच्या रेस्टॉरंटमध्ये एका विद्यार्थीनीने भूट्टा ( म्हणजे आपले मक्याचं भाजलेलं कणीस ) ऑर्डर केला. त्यानंतर जे बिल आले त्याने सोशल मीडियावर गोंधळ माजला आहे. याआधी देखील रेस्टॉरंटच्या जीएसटीवरुन लोकांच्या तीव्र प्रतिक्रीया आलेल्या आहेत.

Virat Kohli च्या रेस्टॉरंटमध्ये एका स्नेहा नावाच्या विद्यार्थीनीने भूट्टा ऑर्डर केला तर तिला त्यानंतर आलेले बिल पाहून तिला धक्का बसला. रस्त्यावर तीस ते पन्नास रुपयांना मिळणारा भूट्टा येथे फारच महाग मिळाला. त्यानंतर तिने या रेस्टॉरंटचे आलेले बिल शेअर केले आहे. या विद्यार्थ्यांने केलेल्या पोस्टमध्ये आता एका प्लेटमध्ये भूट्टा ठेवलेला दिसत आहे.त्यावर कोथिंबिर आणि लिंबूने गार्निशींग केलेली दिसत आहे. हा फोटो पोस्टमध्ये तिने लिहीलेय की मी One8 Commune मध्ये आज 525 रुपयांचे पेमेंट केले आहे. कॅप्शनमध्ये विद्यार्थीनीने एक रडणारी इमोजी टाकली आहे. सामान्यत: स्थानिक बाजारात २० ते ५० रुपये मिळणारा हा भूट्टा आता रेस्टॉरंटमध्ये १० ते १२ पट महाग मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

येथे पाहा पोस्ट –


एक्स युजरच्या प्रतिक्रीया काय ?

स्नेहा हीने Virat Kohli च्या रेस्टॉरंटमध्ये हा भूट्टा ऑर्डर केल्यानंतर आलेले बिल शेअऱ केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर या पोस्टला १२ लाखाहून अधिक व्युज मिळाले आहे. अनेक एक्स युजरनी विविध प्रतिक्रीया दिलेली आहे, एका युजरने लिहीलेय की मग ऑर्डर का केली. मेन्यूत सर्व किंमती लिहीलेली असते ना ? अन्य एका युजरने लिहीलेय की तुम्हाला ऑर्डर करताना याची किंमत माहिती होती. मग आता रडणे बरोबर नाही. दुसऱ्या एका युजरने सर्व ब्रेकअप समजून घेत लिहीले की यात कॉर्नचे दहा रुपये, १०० रुपयेची प्लेट, ५० रुपयाचे टेबल, १०० रुपये खुर्चीसाठी आणि १५० रुपये एसीसाठी आणि ६५ रुपये टॅक्सचे जोडले असल्याचा दावा केला आहे.

मोठ्या शहरांत कोहलीची रेस्टॉरंटची साखळी

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने २०१७ मध्ये वन ८ कम्यून ( One8 Commune ) रेस्टॉरंट चेन सुरू केली. हैदराबादसह ६ प्रमुख शहरांमध्ये तिचे जाळे पसरले आहे. या रेस्टॉरंटचे दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि कोलकाता येथेही आऊटलेट आहेत. याशिवाय, विराट कोहली आता दुबईमध्ये या रेस्टॉरंटचे आऊटलेट उघडण्याची तयारी करत आहे. हैदराबादमध्ये विराटच्या रेस्टॉरंटचे HITEC सिटी आणि नॉलेज सिटीमध्ये देखील आऊटलेट आहेत.