विमान (Air Travel) प्रवास करणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या काळात विमान प्रवास महागणार आहे. कारण जेट् फ्युएलच्या (ATF Price Hike) किंमतीत वाढ करण्यात आली आहे. 5 टक्क्यांनी जेट फ्युएलच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता याचा थेट परिणाम विमान प्रवासाच्या तिकीटदरांवर पाहायला मिळेल. सलग दहाव्यांदा जेट फ्युएलच्या किंमती वाढल्या आहेत. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या आओसी म्हणजेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून (IOC) 16 मे रोजी विमान इंधनाचे दर जारी केले. या वेळी जारी करण्यात आलेल्या दरात वाढ करण्यात आली. 6,188 रुपये प्रति किलोलीटर इतकी भाववाड आयओसीकडून करण्यात आली आहे. विमान इंधनाचे दर सलग दहाव्यांदा वाढले आहे. आता जारी करण्यात आलेले दर हे 31 मे पर्यंत लागू असणार आहेत. एकीकडे विमान वाहतूक महागली असली, तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही वाढ करण्यात आलेली नाही.
दरम्यान, विमान इंधनाचा दर कुठे नेमका किती आहे, हे खालील आकडेवारीतून जाणून घेऊयात…
जेट फ्युएलचे दर वाढल्याचा थेट परिणाम आता विमान प्रवासावर होणार आहे. विमानानं प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. येत्या काळात विमान प्रवासास महागण्याची चिन्हा आहेत. सलग दहा वेळा इंधनाचे दर हे वधारले असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे विमान कंपन्यांना आता तिकीट दर वाढवण्याची शक्यता नाकारात येत नाही.
2022 या वर्षभरात जेट फ्यूएलची किंमत तब्बल 61.7 टक्के इतकी वाढली आहे. 1 जानेवारी 2022 पासून इंधनाचे दर 46,938 इतके वाढले आहे. 1 जानेवारीला जेट फ्युएलचा दर 76 हजार 62 रुपये प्रति किलोलीटर इतका होता. हाच दर आता 1 लाख 23 हजार प्रति कोलोलीटर इतक झालाय.
दर महिन्यात दोन वेळा जेट फ्युएलचे दर जारी केले जातात. दर महिन्याच्या पहिल्या आणि सोळा तारखेला हवाई वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे दर घोषित केले जातात..