ATM चा वापर फक्त पैसे काढण्यासाठीच नाही, या 7 कामांसाठीही करु शकता

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी किंवा शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी करतो. पण तुम्ही ATM चा वापर फक्त पैसे काढण्यासाठीच नाही, तर इतर  7 कामांसाठीही करु शकता.. एटीएम कार्डद्वारे करता येणारी 7 काम 1.कर्ज उपलब्ध : अनेक खासगी […]

ATM चा वापर फक्त पैसे काढण्यासाठीच नाही, या 7 कामांसाठीही करु शकता
Follow us on

मुंबई : सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी किंवा शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी करतो. पण तुम्ही ATM चा वापर फक्त पैसे काढण्यासाठीच नाही, तर इतर  7 कामांसाठीही करु शकता..

एटीएम कार्डद्वारे करता येणारी 7 काम

1.कर्ज उपलब्ध : अनेक खासगी बँकेतील एटीएममध्ये पैसे काढल्यानंतर त्या ग्राहकांना पर्सनल लोनबाबत विचारणा करण्यात येते. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या कर्ज मिळू शकते. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला नेट बँकिंग किंवा बँकेत जाण्याची गरज भासत नाही. तसेच कर्ज प्राप्त झाल्यानंतर तुम्ही एटीएमद्वारेही पैसे काढू शकता.

2. फिक्स्ड डिपॉझिट : अनेकजण बँकेत काही ठराविक रक्कम फिक्स्ड डिपॉझिट (Fixed deposit FD) म्हणून ठेवतात. या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष बँकेत जावं लागतं. मात्र आता एटीएम मशीनद्वारे तुम्ही सहजरित्या एफडीमध्ये गुंतवणूक करु शकता. यासाठी ग्राहकाला एटीएम मशीनच्या स्क्रीनवर मेन्यू या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यातील एफडी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करता येईल. यात डिपॉझिटसाठीचा अवधी आणि रक्कम याबाबतचे वेगवेगळे ऑप्शन देण्यात आलेले आहे.

3. बँकेत पैसे भरणे : देशातील अनेक खासगी आणि सरकारी बँकेतील एटीएममध्ये कॅश डिपॉझिट मशीन बसवण्यात आले आहेत. या मशीनद्वारे तुम्ही स्वत:च्या अकाऊंटमध्ये एका क्लिकवर पैसे भरू शकता. याद्वारे एका वेळी तुम्हाला 49 हजार 900 रुपये भरता येतात. तसंच या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये 50 रुपयाच्या नोटीपासून 2000 रुपयांपर्यंत नोटा स्विकारल्या जातात.

4. इन्शुअरन्सचा हफ्ता भरणे : आपण LIC, HDFC लाईफ, SBI लाईफ यांसारख्या विविध विमा कंपन्यांचे विमा काढतो. त्या विमाच्या दर महिन्याचा हफ्ता भरण्यासाठी कित्येकदा आपल्याला बँकेत किंवा इन्शुअरन्स ऑफिसमध्ये जाव लागतं. मात्र आता एटीएमद्वारे तुम्ही तुमच्या इन्शुअरन्सचा दर महिन्याचा हफ्ता भरु शकता. यासाठी तुम्हाला फक्त एटीएम स्क्रीनवरील बिल-पे सेक्शनला सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर इन्शुअरन्स पॉलिसीचे प्रीमियम भरता येईल.

5. बील भरणे : अनेकजण घरातील वीजचे किंवा गॅसचे बील भरण्यासाठी तात्कळत रांगेत उभे राहतात. पण तुमच्याकडे एटीएम असेल, तर तुम्ही अवघ्या काही सेकंदात एटीएमद्वारे सर्व बील भरु शकता. यासाठी तुम्हाला एटीएममधून बिल पे सेक्शनद्वारे तुम्ही टेलिफोनचे, वीजेचे किंवा गॅसचे बील भरता येईल.

6. इन्कम टॅक्स जमा करणे : एटीएमद्वारे इन्कम टॅक्सही जमा करता येतो, याबाबत अनेकांना कल्पनाही नसेल. पण अनेक बँकांनी ग्राहकांना ही सुविधा दिली आहे. त्याशिवाय अँडवान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट, रेग्युलर असेसमेंट यानंतरचे टॅक्सही ग्राहकाला एटीएमद्वारे भरता येऊ शकतात. पण यासाठी तुमचे वेबसाईट किंवा बँकेतील ब्राँचमध्ये रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे.

7. पैसे ट्रान्सफर करणे : अनेकदा दुसऱ्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवायचे असल्यास आपण पेटीएम, गुगल पे, फोन पे या अॅप्लिकेशनची मदत घेतो. मात्र या अॅप्लिकेशनची मदत घेण्यापेक्षा तुम्ही एटीएमद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करु शकता. याद्वारे ग्राहकाला एकावेळी 40 हजार रुपये ट्रान्सफर करता येतात.

संबंधित बातम्या

एटीएममध्ये पैसे अडकले असतील, तर हा नियम माहित असू द्या

‘या’ आठ शेअर्समध्ये गुंतवणूक करा, नक्कीच फायदा मिळेल