नवी दिल्ली– कोविड काळात (COVID CRISIS) गती मंदावलेल्या ऑटो क्षेत्राचा (AUTO SECTOR) गाडा पुन्हा रुळावर आला आहे. मध्यमवर्गीयांच्या वाढत्या आकांक्षा, आयटी सेक्टरचं बूस्टर, इलेक्ट्रॉनिक वाहनांची चलती यामुळं ऑटो क्षेत्रात वाहन खरेदीत वाढ नोंदविली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात वाहन विक्रीने 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक वाहन विक्रीच्या यादीत स्कोडानं आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत स्कोडाच्या वाहन विक्रीत तब्बल 387 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. गेल्या महिन्यात देशभरातील 5 हजारांहून अधिक ग्राहकांनी स्कोडाच्या (SKODA) खरेदीला पसंती दर्शविली. वाहन विक्रीच्या क्रमवारीत ह्युदाई कंपनीनं तळ गाठला आहे. गेल्या मार्च महिन्यात कंपनीच्या वाहन विक्रीत -15.21% ने घट नोंदविली गेली आहे.
• स्कोडा- (मार्च 2022) 5649/ (मार्च 2021) 1159 (387.40%)
• फोक्सवॅगन-(मार्च 2022) 3672/(मार्च 2021) 2025 (81.33%)
• महिंद्रा-(मार्च 2022) 27603/ (मार्च 2021) 16700 (65.29%)
• टाटा- (मार्च 2022) 42293/ (मार्च 2021) 29654 (42.62%)
• सुझुकी-1,33,861
• ह्युंदाई- 44600
• टाटा- 42,293
• महिंद्रा- 27,603
कोरियन कंपनी Kia ने गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये 22,622 युनिट्स विकल्या आहेत. तर फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीने 8,415 युनिट्सची विक्री केली होती. अलीकडेच कंपनीने थ्री-रो एमपीव्ही कार सादर केली आहे, जी 6-7 सीटर कार आहे.
काश्मीर मुद्द्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवरून ह्युंदाई वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. Hyundai India ने आपल्या ट्विटर अकाउंटवर अधिकृत निवेदन जारी केले आहे. कंपनी गेल्या 25 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहे आणि राष्ट्रवादाच्या भावनेचा मनापासून आदर करते.
टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांनी ग्राहकांवर मोहिनी घातली आहे. टाटाने अपडेटेड Tigor EV सादर केली, तर Nexon EV कार सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी प्रवासी इलेक्ट्रिक कार ठरली आहे. टाटा सध्या तीन EV प्लॅटफॉर्म तयार करत आहे, ज्यामध्ये एक डेडीकेटेड स्केटबोर्ड देखील आहे.
3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स