नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. लॉकडाऊन काळातील रद्द झालेल्या तिकिटांची 75 टक्के रक्कम प्रवाशांना परत केल्याचा दावा विमान वाहतूक कंपन्यांनी केला आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने प्रवाशांना 74.3 टक्के रक्कम परत केल्याचे जाहीर केले आहे. विमान वाहतूक कंपन्यांनी 3200 कोटी रुपये रक्कम प्रवाशांना परत दिली आहे. (Aviation companies refund 3200 crore rupees)
सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑक्टोबरला विमान वाहतूक कंपन्यांना प्रवाशांची तिकीटाची रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार 25 मार्च ते 24 मे दरम्यानच्या कालावधीतील तिकीटांची रक्कम परत करण्यास सागितले होते.
Pursuant to Hon’ble SC’s order on tkt refund, 74.3% of total 55,23,940 PNRs amounting to ₹3,200cr have been refunded. Rest are in process.
2,06,119 credit shells worth ₹219cr created by airlines with consent of passengers. MoCA is constantly monitoring the situation.— MoCA_GoI (@MoCA_GoI) December 11, 2020
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 55 लाख 23 हजार 940 तिकिटांपैकी 74.3 टक्के प्रवाशांचे 3 हजार 200 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. उर्वरित प्रवाशांना रक्कम परत करण्याचे काम सुरु आहे, असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आले. लॉकडाऊनमुळे भारतात 25 मार्चपासून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. 25 मार्चला बंद करण्यात आलेली विमान वाहतूक काही नियमांसह 25 मेपासून सुरु करण्यात आली. (Aviation companies refund 3200 crore rupees)
नागरी उड्डयन मंत्रालयाने 27 जूनपासून प्रवासी क्षमता 45 टक्क्यांपर्यंत वाढवली होती. यानंतर 2 सप्टेंबरला प्रवासी क्षमता 60 टक्केपर्यंत वाढवण्यात आली होती. मंत्रालयाने 11 नोव्हेंबरला विमान कंपन्यांना 70 टक्के प्रवासी क्षमतेसह उड्डाण करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी विमान कंपन्यांची विमानं 60 टक्के प्रवासी क्षमतेने उड्डाण करत होती. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, 25 मे रोजी 30,000 प्रवाशांसह देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली होती. 8 नोव्हेंबर 2020 रोजी देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या 2.06 लाखांवर पोहोचली. नागरी उड्डयन मंत्रालयाने वाढती मागणी लक्षात घेता सरकारने ही मर्यादा वाढवून 70 टक्के केली आहे.
Domestic operations recommenced with 30K passengers on 25 May & have reached 2.06 lakhs on 8 Nov 2020. @MoCA_GoI is now allowing domestic carriers to increase their operations from existing 60% to 70% of the pre-COVID approved capacity.
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) November 11, 2020
संबंधित बातम्या :
कोरोना प्रकरणांमध्ये कमालीची घट, एअरलाइन्सला 70% प्रवासी क्षमतेसह विमान उड्डाणाची परवानगी
राज ठाकरेंची सूचना, सरकारकडून अंमलबजावणी, देशांतर्गत विमान उड्डाणं बंद
(Aviation companies refund 3200 crore rupees)