नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने फिक्स्ड डिपॉझिटवरील (Fixed Deposit) व्याज दर बदलले आहेत. नवीन दर 18 मार्च 2021 पासून लागू झाले आहे. अॅक्सिस बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या विविध कालावधीसाठी एफडी (FD) ऑफर करते. दरम्यान नव्या बदलांनंतर अॅक्सिस बँकेकडून 7 दिवस ते 29 दिवसांदरम्यान मॅच्युअर (एफडीचा कालावाधी पूर्ण होणे) होणाऱ्या एफडीवर 2.50 टक्के व्याज दिलं जाणार आहे. 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 3 टक्के व्याजदर आणि 3 महिने ते 6 महिन्यात मॅच्युअर होण्याऱ्या एफडीवर 3.5 टक्के व्याज मिळेल. (Axis Bank revises fixed deposit interest rates. check FD rates here)
अॅक्सिस बँक सहा महिने ते 11 महिन्यात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 4.40 टक्के व्याज देत आहे. तर 11 महिने 25 दिवस ते 1 वर्ष 5 दिवसांच्या एफडीवरील व्याज दर 5.15 टक्के आणि 1 वर्ष 5 दिवसापासून 18 महिन्यांपेक्षा कमी एफडीचा व्याज दर 5.10 टक्के आहे. अॅक्सिस बँक 18 महिने ते 2 वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर 5.25 टक्के व्याज देत आहे. अॅक्सिस बँक 2 वर्ष ते 5 वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींवर 5.40% आणि 5 वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 5.75% व्याज देत आहे.
(कालावधी आणि व्याजदर)
7 दिवस ते 14 दिवस – 2.50%
15 दिवस ते 29 दिवस – 2.50%
30 दिवस ते 45 दिवस – 3%
46 दिवस ते 60 दिवस – 3%
61 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी – 3%
3 महिने ते 4 महिन्यांपेक्षा कमी – 3.5%
4 महिने ते 5 महिन्यांपेक्षा – 3.5% कमी
5 महिने ते 6 महिन्यांपेक्षा कमी – 3.5%
6 महिने ते 7 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%
7 महिने ते 8 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%
8 महिने ते 9 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%
9 महिने ते 10 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%
10 महिने ते 11 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%
11 महिने ते 11 महिने 25 दिवसांपेक्षा कमी – 4.40%
11 महिने 25 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 5.15%
1 वर्ष ते 1 वर्ष 5 दिवसांपेक्षा कमी – 5.15%
1 वर्ष 5 दिवस ते 1 वर्ष 11 दिवसांपेक्षा कमी – 5.10%
1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसांपेक्षा कमी – 5.10%
1 वर्ष 25 दिवस ते 13 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
13 महिने ते 14 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
14 महिने ते 15 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
15 महिने ते 16 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
16 महिने ते 17 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
17 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%
18 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी – 5.25%
2 वर्षे ते 30 महिन्यांपेक्षा कमी – 5.40%
30 महिने ते 3 वर्षांपेक्षा कमी – 5.40%
3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी – 5.40%
5 वर्ष ते 10 वर्ष – 5.75%
अॅक्सिस बँक (Axis Bank) ज्येष्ठ नागरिकांना निवडक मॅच्युरिटीवर जास्त व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या ठेवींवर 2.5% ते 6.5% पर्यंतचे व्याज मिळेल.
यावर्षी जानेवारीमध्ये अॅक्सिस बँकेने 15 डिसेंबर 2020 किंवा त्यानंतर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बुक केलेल्या नवीन किरकोळ मुदत ठेवी मुदतीपूर्वी बंद केल्याबद्दलाच दंड न आकारण्याची घोषणा केली. रिटेल ग्राहकांना लिक्विडिटीच्या अचानक गरजांची चिंता न करता दीर्घकालीन बचतीसाठी प्रोत्साहित करणे हा त्याचा हेतू आहे. ही सवलत नवीन एफडी (FD) आणि आरडीमध्ये (RD) उपलब्ध असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
इतर बातम्या
Home Loan : गृहकर्ज घेण्यास अडचण येतेय, मग या गोष्टींकडे द्या लक्ष, सहज उपलब्ध होईल कर्ज
(Axis Bank revises fixed deposit interest rates. check FD rates here)