शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरु असले तरी बुधवारी काही कंपन्यांचे शेअर रॉकेट ठरले. योगगुरु रामदेव बाबा यांची कंपनी पतंजली फूड्स लिमिटेडचा शेअर असाच वधारला. या शेअरमध्ये 5 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसली. तर भाव 1913.35 रुपयांपर्यंत पोहचला. हा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला. या शेअरबद्दल बाजारातील ब्रोकरेज फर्म आशावादी आहेत. हा शेअर तुफान तेजीत असेल, असा दावा करण्यात येत आहे.
ब्रोकरेज फर्मचा काय सल्ला
ब्रोकरेज Systematix ने पतंजली फूड्स लिमिटेडचा शेअर खरेदीसाठी अनुकूलता दाखवली आहे. हा शेअर 2259 रुपयांपर्यंत उसळी घेण्याचा दावा या ब्रोकरेज फर्मने केला आहे. या शेअरमध्ये 20 टक्क्यांपेक्षा अधिकच्या वाढीचा अंदाज आहे. खाद्य तेल व्यवसायात पतंजली फूड्स आक्रमक दिसत आहे. कंपनीने त्यासाठी नवीन धोरण ठरवले आहे. पतंजली खाद्य उद्योगात मोठी कामगिरी बजावण्याच्या तयारीत आहे.
कंपनीचा तिमाही अंदाज काय
पतंजली फूड्सनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून तिमाहीत एकल आधारावर कंपनीचा नेट प्रॉफिट तीन पट होऊन 262.90 कोटी रुपये झाला. एक वर्षापूर्वी याच समान तिमाहीत या कंपनीचा फायदा 87.75 कोटी रुपये होता. कमी उत्पन्न असताना पण या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला फायदा झाला आहे. तर एकूण उत्पन्नात घसरण होऊन या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत 7,202.35 कोटी रुपयांवर आले आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत महसूली आकडा 7,810.50 कोटी रुपये होता. गेल्या काही दिवसांपासून पतंजली फूड्सने खाद्यतेल बाजारात उभारी घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
तर कोल्हापूरच्या साडी तयार करणारी कंपनी सरस्वती साडी डिपोचा शेअर BSE वर 200 रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर आयपीओमध्ये या शेअरची किंमत 160 रुपये प्रति शेअर होता. एका स्टॉकमागे गुंतवणूकदारांना 40 रुपयांचा फायदा झाला. ज्या गुंतवणूकदारांनी या आयपीओत दोन लाख रुपये गुंतवले. त्यांना अवघ्या 4 दिवसांत 2.50 लाखांचा परतावा मिळाला. चारच दिवसांत 50 हजारांची लॉटरी लागली.