National Pension System | सुरक्षित भविष्यासाठी अनेक जण राष्ट्रीय निवृत्ती योजनेत (National Pension System) गुंतवणूक करतात. आयुष्याच्या संध्याकाळी औषधांसाठी आणि दैनंदिन खर्चासाठी आजची केलेली गुंतवणूक उपयोगी ठरते. त्यामुळे अनेक जण एनपीएसमध्ये (NPS) गुंतवणूक करतात. तुम्ही ही या योजनेत गुंतवणूक करत असाल तर ही महत्त्वाची बातमी आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (PFRDA) राष्ट्रीय निवृत्ती योजनेत टियर-2 खात्यात क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या गुंतवणुकीवर बंदी घातली आहे. आता क्रेडिट कार्डद्वारे टियर-2 खात्यात वर्गणी किंवा योगदान कोणत्याही कामासाठी पैसे भरू शकणार नाही. पीएफआरडीएने 3 ऑगस्ट रोजी ही माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया की यापूर्वी टियर-1 आणि टियर-2 खात्यांमध्ये क्रेडिट कार्डद्वारेही पेमेंट केले जाऊ शकते.
राष्ट्रीय निवृत्ती योजनेत क्रेडिट कार्डद्वारे गुंतवणुकीचा पर्याय थांबवण्यात आला असला तरी या गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय अद्याप ही खूला राहणार आहे. त्यांना क्रेडिट कार्डद्वारे गुंतवणूक करण्यास अनुमती देण्यात आली आहे. एनपीएस हे एकमेव बचत साधन आहे ज्याने ग्राहकांना ईएनपीएस पोर्टलद्वारे त्यांचे क्रेडिट कार्ड वापरुन गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. पण टियर-2 खात्यासाठी ही सुविधा बंद करण्यात येत आहे. एनपीएस टियर-1 खात्यासाठी क्रेडिट कार्ड पेमेंटची सुविधा अद्याप उपलब्ध आहे.
टियर-1 क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट कसे करावे
एनपीएसमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सोपी आहे. क्रेडिट कार्डद्वारे गुंतवणूक कशी करावी हे जाणून घ्या.
https://enps.nsdl.com/eNPS/National Pension Sys
ई-एनपीएस वेबसाइटवर जा, त्यानंतर ‘नॅशनल पेन्शन सिस्टिम’ टॅबवर क्लिक करा.
‘योगदान’ टॅबवर क्लिक करा.
पी.एन.ए.आर.ए.एन., जन्मतारीख प्रविष्ट करा.
एनपीएस ग्राहक प्रकारासाठी टॉगल निवडा.
फोनवर ओटीपी हवा आहे की ई-मेल आयडीवर हवा आहे हे देखील निवडा.
सर्व तपशील प्रविष्ट केले की, कॅप्चा भरा.आणि ‘व्हेरिफाइड पीआरएएन’ वर क्लिक करा.
आता अकाउंटचा प्रकार (टियर 1) निवडा.
तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी लागणारी रक्कम टाका
त्यानंतर गुंतवणूक / देयकाकडे जा.
क्रेडिट कार्ड असलेल्या बँकेतून पेमेंट करू शकता.
एनपीएस टियर-2 खात्यांमध्ये पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड स्वीकारणे त्वरित बंद करण्याचे निर्देश पेन्शन नियामकाने सर्व बिंदू ऑफ प्रेझेन्स (POP) दिले आहेत. टायर-2 खात्यांमध्ये पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, एनपीएसच्या टियर-२ खात्यांसाठी पेमेंट पद्धतींमध्ये क्रेडिट कार्डचा वापर त्वरित प्रभावाने थांबवावा, अशी सूचना सर्वांना दिल्याची माहिती ‘पीएफआरडीए’ने दिली आहे.
नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) ही एक पेन्शन योजना आहे. हे आपल्याला गुंतवणूकीची सुविधा तसेच त्यावर कर लाभाचा दावा करण्याची संधी देते. एनपीएसमधील कलम 80 सीसीडी (1) अन्वये दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावटीचे दावे करता येतात. त्यामुळे करदायित्व कमी होते.