नवी दिल्ली | 11 मार्च 2024 : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ( RBI ) ने साल 2024 च्या बॅंक हॉलिडेची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मार्च महिन्यांत भरपूर दिवस बॅंक बंद असणार आहेत. आरबीआय राष्ट्रीय पातळीवर बॅंक हॉलिडेंची यादी जारी केली आहे. वेगवेगळ्या राज्यातील सुट्ट्याशिवाय या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. मार्च महिन्यात तुमचे काही बॅंकेत काम असेल तर आधी या सुट्ट्यांची यादी पाहूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुमची फेरी वाया जाणार नाही. मार्च महिन्यात होळीचा सण देखील आहे. मार्च महिन्यात आता तब्बल 11 दिवस बॅंक बंद असणार आहे. चला तर पाहूयात कोणकोणत्या दिवशी बॅंकांचे कामकाज बंद असणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनूसार मार्च महिन्यामध्ये भरपूर दिवस बॅंका बंद आहेत. मार्च महिन्यात जवळपास 11 दिवस बॅंका बंद आहेत. या दरम्यान बॅंका बंद असल्याने तुमचे बॅंकेचे काम होऊ शकणार नाही. चला तर पाहूयात मार्च महिन्यात केव्हा केव्हा बॅंका बंद आहेत.
17 मार्च 2024 : रविवारी देशभरात बँका बंद राहतील.
23 मार्च 2024 : महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
31 मार्च 2024 : रविवारी देशभरात बँका बंद राहतील
याशिवाय, मार्चमध्ये होळी सण आणि इतर कारणांनी राज्यस्तरावर अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत.
22 मार्च 2024 : बिहार दिनानिमित्त बिहारमधील बँका बंद राहतील.
25 मार्च 2024 : होळी / धुलेती / डोल जात्रा / धुलंडीच्या निमित्ताने अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
26 मार्च 2024 : Yaosang दुसरा दिवस / होळी बँका Yaosang मुळे अनेक राज्यांमध्ये बंद राहतील.
27 मार्च 2024 : बिहारमध्ये 27 मार्चला होळीच्या निमित्ताने बँका बंद राहतील