उद्या, 1 जानेवारी 2025 रोजी कॅलेंडरचं पहिले पान समोर असेल. नवीन वर्षाची सुरुवात होईल. नवीन वर्षासाठी कोणी संकल्प सोडले आहे तर काहींना बँकेची कामं झटपट उरकायची आहेत. जानेवारी महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद आहेत. नवीन वर्षात सुट्या ठाण मांडून आहेत. तेव्हा तुम्हाला महत्त्वाचे एखादे काम करायचे असेल तर झटपट पूर्ण करा. तर बँकेत जाण्यापूर्वी सुट्यांची ही यादी तपासा.
1 जानेवारी रोजी बँकांना सुट्टी?
वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँकांना सुट्टी असेल. 1 जानेवारी 2025 रोजी बँका बंद असतील. अर्थात देशातील सरसकट सर्वच बँकांना सुट्टी असणार नाही. काही बँका नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरू असतील. तर काही शाखा बंद असतील.
15 दिवस बँकांना सुट्टी
RBI प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेसंबंधीच्या सुट्यांची यादी जाहीर करते. या यादीनुसार, जानेवारी महिन्यात 31 दिवसातील जवळपास 15 दिवस सुट्टी असेल. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचा समावेश आहे. अर्थात सर्वच राज्यात एकाच दिवशी सुट्टी नसेल. काही राज्यात एकाच दिवशी बँका बंद असतील. तरीही कामांचा खोळंबा टाळण्यासाठी सुट्यांच्या यादीवर एक नजर टाका.
जानेवारी 2025 मधील सुट्यांची यादी (January 2025 Bank Holiday List)
1 जानेवारी : नवीन वर्ष
2 जानेवारी : मन्नम जयंती
5 जानेवारी : रविवार
6 जानेवारी: गुरु गोविंद सिंग जयंती
11 जानेवारी : दुसरा शनिवार
12 जानेवारी : रविवार
14 जानेवारी : मकर संक्रांत, पोंगल
15 जानेवारी : तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू, मकर संक्रांती
16 जानेवारी : उज्जावर तिरुनल, तामिळनाडूत बँक बंद
19 जानेवारी : रविवार
22 जानेवारी : इमोईन, मणिपूरमध्ये बँक बंद
23 जानेवारी : नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
25 जानेवारी : चौथा शनिवार
26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी : शहीद दिन, सिक्कीममध्ये सुट्टी
ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.