नवी दिल्ली: ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांमुळे बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना बँक खाते, वैयक्तिक माहिती, पिन यासह इतर गोष्टी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करु नका, असं कळवलं आहे. एखाद्या ग्राहकांनं त्याची माहिती सोशल साईटसवर शेअर केल्यास त्याला नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. (Bank of India issue Alert to its customer beware of the sharing details on social Media Platforms)
बँक ऑफ इंडियानं ट्विट करत ग्राहकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्ती बँकांच्या टोल फ्री क्रमांकासारखे क्रमांक बनवून ग्राहकांची फसवणू करु शकतात. त्यामुळं ग्राहकांनी मोबाईल फोन किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचा PIN, CVV, OTP आणि कार्डच्या डिटेल्स इतरांशी शेअर करु नका, असं बँक ऑफ इंडियानं कळवलं आहे.
Alert! pic.twitter.com/ozTlslrfwV
— Bank of India (@BankofIndia_IN) May 3, 2021
कोरोना विषाणू संसर्गाचा काळ असल्यानं डिजीटल व्यवहार वाढेलेले आहेत. डिजीटल आणि ऑनलाईन व्यवहार वाढल्यानं ग्राहकांना विविध मार्गानं फसवलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहणं आवश्यक आहे. ऑनलाईन व्यवहार वाढत असल्यानं ग्राहकांनी त्यांची खासगी माहिती शेअर करताना सतर्कता बाळगली पाहिजे.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यानं सरकारी आणि खासगी बँका ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून सतर्क करत असतात. जर एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली असल्यास ते भारत सरकारच्या https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करु शकतात.
ग्राहकांनी कोणालाही पॅन कार्ड (PAN Card) माहिती, आयएनबी प्रमाणपत्रे, मोबाइल नंबर, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि यूपीआय व्हीपीए सांगू चुकूनही सांगू नका. जर तुम्ही कोणतीही खासगी माहिती एखाद्याबरोबर शेअर केली तर तुमचे अकाऊंट खाली होऊ शकते.
संबंधित बातम्या:
SBI, ICICI आणि PNB च्या ग्राहकांनो सावधान; अन्यथा बँकेचं खाते होईल रिकामं
(Bank of India issue Alert to its customer beware of the sharing details on social Media Platforms)