मुंबई : भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशातील काही राज्ये सोडल्यास अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. त्यामुळे बँकाच्या कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. मे महिन्यातील राहिलेल्या दिवसांमध्ये खासगी आणि सार्वजनिक बँका एकूण 8 दिवस बंद राहणार आहेत. बँकांच्या विविध सुट्यांमुळे 4 दिवस बँका बंद राहतील. सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडल्यास मे महिन्यातील पुढील दिवसात बँका एकूण 8 दिवस बंद राहतील.(Banks holidays in May bank will closed for eight days banks due to various holidays)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वेबसाइटनुसार मे 2021 मध्ये बँकाना 9 दिवस सुट्टी राहणार होती. यापैकी 1 मे कामगार दिनाची सुट्टी होऊन गेलेली आहे. रमजान, बुद्ध पौर्णिमा अशा विविध उत्सवांमुळे बँका पुढील काळात बंद असणार आहेत.
देशामध्ये वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे बँकांमध्ये काम करण्याची पध्दत ही बदलेली आहे. कोरोना झोनमध्ये असलेल्या बँकांच्या कर्मचार्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी सुविधा मर्यादित केल्या आहेत. यासह अनेक राज्यांतील बँकांचे कामकाजाचे तास कमी करण्यात आले आहेत.
SBI ची भन्नाट योजना, मुदत ठेवीतील पैसे ATM मधून काढता येणार, वाचा सविस्तरhttps://t.co/QJ6xtrzcxY#SBI | #Corona | #Statebank | #BusinessNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2021
Bank Holidays : मे महिन्यात 9 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी !
या सरकारी बँकेकडून ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट, व्याज दरांमध्ये केली कपात
(Banks holidays in May bank will closed for eight days banks due to various holidays)