नवी दिल्ली : इंग्लंडचे मीडिया हाऊस, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (BBC) केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नुकतीच एक डॉक्यूमेंट्री प्रसारीत केली होती. भारतात या डॉक्यूमेंट्रीवरुन (Documentary) वादंड माजले. देशात त्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता आयकर विभागाने बीबीसीच्या भारतातील दिल्ली आणि मुंबई कार्यालयांवर धाड घातली. आयकर खात्याने ही धाड नसून सर्वेक्षण (Income Tax Survey) असल्याचे ठामपणे सांगितले. यावरुन विरोधकांनी केंद्र सरकार (Central Government) सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप केला. अर्थात बीबीसी ही जुनी वृत्तसंस्था आहे. जगभरात बीबीसीची कार्यालये आणि प्रतिनिधी आहे. या वृत्त संस्थेचा पसारा फार मोठा आहे. या संस्थेची उलाढालही फार मोठी आहे. बीबीसीची कमाई आणि नफ्याचे गणित तुम्हाला आर्श्चयाचा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या छोट्या देशाचा अर्थसंकल्प यात होऊ शकतो.
वृत्तानुसार, बीबीसीच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे मोबाईल बंद करण्यास सांगण्यात आले होते. 14 फेब्रुवारी रोजी सर्वेक्षणाच्या दिवशी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना इमारतीच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. बीबीसीच्या लंडन येथील कार्यालयाला या घटनाक्रमाची माहिती देण्यात आली.
अर्थात दिवसभर चाललेल्या नाट्यमागे मोदी सरकारचे सूडबुद्धीचे राजकारण असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारवर तिखट प्रतिक्रिया दिली. ‘India: The Modi Question’ या डॉक्यूमेंट्रीनंतरच केंद्र सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला. ही डॉक्यूमेंट्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 2002 मधील गुजरात दंगलीसंबंधी आहे.
अर्थात ही डॉक्यूमेंट्रीत एकतर्फी आणि पूर्वग्रहदुषित मताने चित्रिकरण केल्याचा भाजपने आरोप केला होता. केंद्र सरकारने भारतात या डॉक्यूमेंट्रीवर बंदी घातली होती. डाव्या विद्यार्थी संघटनांनी या बंदीलाही विरोध केला होता. ब्रिटिश सरकारच्या एका मंत्र्यांने या डॉक्यूमेंट्रीसंबंधी खेद ही व्यक्त केला होता. पण या डॉक्यूमेंट्रीचे विविध परिणाम दिसून येत आहेत.
प्राप्तिकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर धाडसत्र आरंभिले. दिवसभर आणि दुसऱ्या दिवशीही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची टीम हजर होती. आयकर विभागाने प्राप्तिकर खात्याच्या नियमानुसार, हे कर चोरी संदर्भातील सर्वेक्षण असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) हे इंग्लंडचे मीडिया हाऊस आहे. बीबीसी रॉयल चार्टर अंतर्गत कार्यरत आहे. इंग्लंडच्या राजघराण्याद्वारे दिलेल्या अधिकारातून ही वृत्तसंस्था सुरु आहे. बीबीसीचे जगभर कार्यालये आहेत. बीबीसीचे मजबूत नेटवर्क आहे. जगातील खडानखडा माहिती बीबीसी जमविते.
बीबीसी समूह चालविण्यासाठी 3000 कोटी रुपये खर्च आहे. तर बीबीसीचा निव्वळ नफा 2021 मध्ये 2700 कोटी रुपये होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीबीसीची एकूण संपत्ती 31,000 कोटी रुपये आहे. यावरुन या वृत्तसंस्थेचा डोलारा किती मोठा आहे हे समजून येते.