Repo Rate : आरबीआय हिसकावणार तुमचे सुख? रेपो दरात आता किती होणार वाढ

| Updated on: Apr 02, 2023 | 7:00 PM

Repo Rate : रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक 3, 5 आणि 6 एप्रिल रोजी होत आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँक रेपो दरात पुन्हा वाढ करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कर्जदारांवर EMI चा बोजा पडणार आहे. किती पडू शकतो ईएमआयचा बोजा?

Repo Rate : आरबीआय हिसकावणार तुमचे सुख? रेपो दरात आता किती होणार वाढ
EMI वाढणार?
Follow us on

नवी दिल्ली : महागाईपासून जनतेची सूटका होण्याची शक्यता फारच कमी आहे. चाकरमान्याची अवस्था तर अत्यंत वाईट झाली आहे. महागाईच्या (Inflation) मगरमिठ्ठीत त्यांचा दम कोंडला आहे. कोरोना काळात व्याजदर कमी असल्याने अनेकांनी घराचे स्वप्न पाहिले. जनजीवन पूर्वपदावर आले, पण त्याने महागाईल निमंत्रण दिले. गेल्या वर्षभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. इंधनापासून ते बारीक सारीक वस्तूंपर्यंत दरवाढीचे चटके सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यातच यापूर्वी रेपो दरात (Repo Rate) वाढ झाल्याने ईएमआयमध्ये (EMI) अथवा कर्जाच्या कालावधीत वाढ झाली आहे. त्याचा फटका कर्जदारांना बसला आहे. आता 3 एप्रिलपासून रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक (MPC) सुरु होत आहे, जनतेने पुन्हा धसका घेतला आहे.

किती वाढू शकतो रेपो दर
किरकोळ महागाईचा दर 6 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेसह जगभरातील केंद्रीय बँकांनी आक्रमक धोरण राबवत रेपो दर वाढवला आहे. फेब्रुवारी महिन्यात पूर्वअंदाजाप्रमाणे आरबीआयने रेपो दरात वाढ केली होती. आता रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. एमपीसीची बैठक 3 एप्रिल पासून सुरु होत आहे. तीन दिवसांपर्यंत ही बैठक असेल. मे 2022 सुरु असलेल्या व्याज दर वृ्द्धीच्या चक्रातील ही अखेरची वाढ असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

फेब्रुवारीत झाली होती वाढ
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने गेल्या वर्षी मे 2022 पासून सातत्याने रेपो दरात वाढीचा धडाका लावला आहे. या संपूर्ण चक्रात रेपो दर 4 टक्क्यांहून वाढून 6.50 टक्क्यांवर पोहचला आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

ग्राहक निर्देशांक किती?
ग्राहक मूल्य निर्देशाकावर (CPI) आधारीत महागाई जानेवारी 6.52 टक्के तर फेब्रुवारी महिन्यात 6.44 टक्के होती. अजूनही किरकोळ महागाई आरबीआयच्या 6 टक्के या प्रमाणित धोरणापेक्षा अधिक आहे. परिणामी आता रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. एमपीसीची बैठक 3 एप्रिल पासून सुरु होत आहे

अशी झाली वाढ
आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता. 7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला आहे.

मंदीच्या काळाची आठवण
अमेरिका आणि युरोपात सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. व्याज दर आता 4.75 हून 5 टक्क्यांवर पोहचला आहे. 2008 साली मंदी होती. त्यावेळी जो व्याजदर होता, तोच आता आहे. गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये फेडने 9 वेळा व्याज दरात वाढ केली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे चेअरमन पॉवेल यांनी यापेक्षाही कडक इशार दिला आहे. गरज पडली तर महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याज दरात वाढ करण्याचा इशारा त्यांनी दिला.