विवाहापूर्वी अनंत अंबानी यांनी पूर्ण केला ड्रीम प्रोजेक्ट, ‘वनतारा’ची काय आहेत वैशिष्ट्ये

| Updated on: Mar 01, 2024 | 12:50 PM

वनतारा हे माझ्या जीवनाचे मिशन बनले आहे. आमचे सर्व लक्ष देशातील लुप्क होणाऱ्या प्रजातींचे रक्षण करण्याकडे आहे. देशातील संकटग्रस्त जातीचे येथे रक्षण आणि संवर्धन केले जाणार असल्याचे अनंत अंबानी यांनी म्हटले आहे. करुणाची भावना आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. या प्राणीसेवेला आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विवाहापूर्वी अनंत अंबानी यांनी पूर्ण केला ड्रीम प्रोजेक्ट, वनताराची काय आहेत वैशिष्ट्ये
anant ambani radhika
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

जामनगर | 29 फेब्रुवारी 2024 : प्रख्यात अब्जाधीश आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी यांचा धाकटे पूत्र अनंत अंबानी यांच्या विवाहाचा प्री वेडिंग समारंभ 1 मार्चपासून गुजरातच्या जामनगर येथे सुरु होत आहे. या सोहळ्याला जगभरातील नामवंत मंडळी वऱ्हाडी म्हणून उपस्थित राहीली आहेत. या समारंभात अनंत अंबानी यांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट लॉंच केला आहे. त्यांनी जंगली प्राण्यांच्या पुनर्वसन करण्याचा ‘वनतारा’ प्रकल्प लॉंच केला आहे. रिलायन्सच्या जामनगरातील कॉम्प्लेक्सच्या ग्रीन बेल्टमध्ये वनतारा प्रकल्पासाठी 3000 एकराची जमिन देण्यात आली आहे. संपूर्ण वन्यप्राण्यांसाठी समर्पित असलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.

वनतारा प्राणी पुनर्वसन प्रकल्पात 200 हत्तींसह अनेक जंगली प्राण्यांना जीवनदान दिले जाणार आहे. यात अनेक पशुपक्षी आणि सरपटणारे जीव सुद्धा आहेत. गेंडे, चित्ते आणि मगरींसह अनेक प्राण्यांचे पुनर्वसन केले जात आहे. येथे भारतातीलच नाही तर जगभरातील उपेक्षित प्राण्यांचे पालनपोषणासाठी आणले आहेत.

वनतारात काय आहे सुविधा

‘वनतारा’ प्रकल्पात हत्तींसाठी विशेष शेल्टर तयार केले आहे. हत्तींना अंघोळ करण्यासाठी खास जलाशय बनविला आहे. हत्तींना जॅकुझी आणि मसाजची सुविधा मिळणार आहे. 200 हुन अधिक हत्तींच्या सेवेसाठी 500 हून अधिक कर्मचारी आणि म्हाऊत येथे तैनात असणार आहेत.
या शिवाय वनतारात एक्स-रे मशिन, लेझर मशिन, हायड्रोलिक पुली आणि क्रेन, हायड्रोलिक सर्जिकल टेबल आणि हायपरबेरिक ऑक्सीजन चेंबर आणि हत्तींच्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा असणार आहे. येथे हतींवर उपचार करण्यासाठी सुसज्ज हॉस्पिटल असणार आहे. ते 25 हजारचौरस फूट जागेवर उभारले आहे. अन्य प्राण्यासाठी 650 एकर जागेवर पुनर्वसन केंद्र उभारले आहे. तसेच 1 लाख चौरसफूट जागेवर हॉस्पिटल देखील बांधले आहे.

माझे बालपणापासूनचे स्वप्न

वनतारा एनिमल रेस्क्यू अॅण्ड रिहेबिलिटेशन सेंटरसाठी एकूण 2100 कर्मचारी नेमले आहेत. येथे 200 हून अधिक बिबट्यांचे पुनर्वसन केले आहे. येथे तामिळनाडू येथील लोकसंख्येची घनता जादा असलेल्या ठिकाणाहून 1000 हून अधिक मगरींना आणून त्यांचे येथे पुनर्वसन केले आहे. वनतारा प्रकल्पात एकूण 43 प्रजातीच्या 2,000 हून अधिक प्राण्यांचे पुनर्वसन केले आहे. यात मार्जार वर्गातील प्राणी, शाकाहारी आणि सरपटणारे प्राण्यांचाही समावेश आहे. आपले लहानपणापासूनचे हे स्वप्न होते.