Best Mutual Funds to Invest | भारतीय शेअर बाजारावरील (Share Market) संकटांची मालिका कमी झाली आहे. कोरोना काळात तेजीत राहिलेला बाजार यंदा सुरुवातीपासूनच मंदीच्या छायेत होता. मे, जून, जुलै तर शेअर बाजारासाठी सर्वात वाईट काळ ठरला. गुंतवणूकदारांचे (Investors) कोट्यवधी रुपये बुडाले. बाजारातील अस्थिरता बघता परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गाशा गुंडाळला. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) बाजारातून काढता पाय घेतला. भारतीय बाजार गंटागळ्या खात असताना अचानक बदल झाला. गेल्या महिना भरापासून बाजार पुन्हा जून्या रंगात न्हाऊन निघाला. चैतन्याचे वातावरण आले. बाप्पा विघ्नहर्त्याने गुंतवणूकदारांना दिलासा दिला. बाजार सावरलाच नाही तर विदेशी गुंतवणूकदारही झपाट्याने वाढले. त्यामुळे शेअर बाजारावर आधारीत म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणुकीचा विचार करत असाल तर शीर्ष रेटिंग एजन्सी क्रिसिलने (Crisil) सर्वोच्च रेटिंग (Rating) दिलेल्या चार म्युच्युअल फंडाविषयी चर्चा पाहुयात.
एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड ही फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडातंर्गत (HDFC Flexi Cap Fund – Direct Plan – Growth) वृद्धी योजना आहे. यामध्ये एसआयपी (SIP) गुंतवणूक करता येते. या फंडचा एनएव्ही (NAV) 1167.939 रुपये आहे आणि भाग भांडवल 29096.42 कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त, या निधीचे खर्चाचे प्रमाण (ER) 1.06% आहे.
गेल्या 1 वर्षात SIP परतावा (संपूर्ण परतावा) 10.09% होता, गेल्या 2 वर्षात 30.59% परतावा मिळाला आहे, गेल्या 3 वर्षात या फंडने 50.91% परतावा दिला आहे, गेल्या 5 वर्षात 61.33% परतावा दिला आहे. SIP द्वारे वार्षिक परतावा मागील 1 वर्षात 19.12%, मागील 2 वर्षात 27.95% आणि मागील 3 वर्षात 28.6% होता.
क्वांट फोकस्ड फंड – डायरेक्ट प्लॅन – ग्रोथ क्वांट फोकस्ड फंड हा फोकस म्युच्युअल फंड (Quant Focused Fund – Direct Plan – Growth Quant Focused Fund) रेटिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. यामध्ये SIP गुंतवणूक करता येते. या फंडचा एनएव्ही (NAV) 60.375 रुपये आहे, याचे भागभांडवल 110.33 कोटी रुपये आहे. तर निधी खर्चाचे प्रमाण (ER) 0.57% आहे.
गेल्या 1 वर्षात या योजनेत SIP परतावा (संपूर्ण परतावा) 8.44% होता, गेल्या 2 वर्षात 26.56% परतावा मिळाला. गेल्या 3 वर्षात फंडने 51.51% परतावा दिला आहे, गेल्या 5 वर्षात 68.01% परतावा मिळाला आहे. मागील 1 वर्षात SIP द्वारे केलेल्या गुंतवणुकीत वार्षिक परतावा 15.93%, मागील 2 वर्षात 24.41% आणि मागील 3 वर्षात 28.89% मिळाला आहे.
निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड – थेट योजना – ग्रोथ निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड (Nippon India Large Cap Fund – Direct Plan – Growth Nippon India Large Cap Fund) हा लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे. या फंडचा एनएव्ही (NAV) 58.11 रुपये आहे. भागभांडवल 11724.48 कोटी रुपये आहे. तर या निधीचे खर्चाचे प्रमाण (ER) 1.08% आहे.
गेल्या 1 वर्षात या फंडने SIP परतावा (संपूर्ण परतावा) 7.97% होता, गेल्या 2 वर्षात 26.02% परतावा दिला आहे, गेल्या 3 वर्षात 43.94% परतावा दिला आहे, फंडने गेल्या 5 वर्षात 53.54% परतावा मिळाला आहे. फंडमध्ये SIP द्वारे गुंतवणुकीवर वार्षिक परतावा मागील 1 वर्षात 15.03%, मागील 2 वर्षात 23.94% आणि मागील 3 वर्षात 25.11% मिळाला.
पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड – डायरेक्ट प्लॅन – ग्रोथ पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड (PGIM India Midcap Opportunities Fund – Direct Plan – Growth PGIM India Midcap Opportunities Fund) हा मिडकॅप म्युच्युअल फंड आहे. या फंडचा एनएव्ही (NAV) 50.57 रुपये आहे. एकूण भागभांडवल 6022.66 कोटी रुपये आहे. तर फंड निधीचे खर्चाचे प्रमाण (ER) 0.42% आहे.
गेल्या 1 वर्षात SIP परतावा (संपूर्ण परतावा) 8.9% होता, गेल्या 2 वर्षात 36.34% परतावा मिळाला आहे, गेल्या 3 वर्षात त्याने 81.59% परतावा दिला आहे, गेल्या 5 वर्षात 113.12% परतावा दिला आहे. मागील 1 वर्षात फंडमध्ये SIP द्वारे केलेल्या गुंतवणुकीच्या आधारे वार्षिक परतावा 16.81%, मागील 2 वर्षात 32.92% आणि मागील 3 वर्षात 42.80% होता.
इक्विटी/म्युच्युअल फंड/एसआयपी/ईएलएसएस/डेट्समध्ये गुंतवणूक केल्याने आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी. अभ्यास करुन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच त्यांनी गुंतवणूक करावी.