Paytm चा गुड गव्हर्नन्ससाठी मोठा निर्णय, बोर्ड सदस्यांचा वार्षिक पगार 1.65 कोटींवरुन थेट..इतका कमी होणार

| Updated on: Aug 21, 2024 | 10:25 PM

पेटीएम कंपनीने आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करण्याठी गेल्या काही दिवसात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. कंपनीने आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीच्या आधी बोर्ड मेंबर्सचे मानद वेतन कमी करण्याचा प्रस्ताव मंडळापुढे ठेवला आहे.

Paytm चा गुड गव्हर्नन्ससाठी मोठा निर्णय, बोर्ड सदस्यांचा वार्षिक पगार 1.65 कोटींवरुन थेट..इतका कमी होणार
Follow us on

फिनटेक कंपनी पेटीएमने सातत्याने आपली फायनान्सिएल स्थिती मजबूत करण्यासाठी अलिकडेच मोठे निर्णय घेतले आहेत. असाच एक मोठा निर्णय पेटीएम कंपनीने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी घेतला आहे. यात कंपनीने आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ( संचालक मंडळाचे सदस्य ) वार्षिक वेतन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमची मातृसंस्थेने ( वन 97 कम्युनिकेशन ) म्हटलंय की संचालक मंडळाचे वेतन कपात करण्याच्या पर्यायाचा वापर करण्याच्या विचारात असल्याचे कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या सूचनेत म्हटले आहे.

नवीन सुधारित वेतन रचना कंपनीने केलेल्या बेंचमार्किंगवर आधारित असल्याचे पेटीएम कंपनीचे म्हणणे आहे. समान मार्केट कॅपिटलायझेशन आणि तत्सम क्षेत्रातील कंपन्यांची वेतन रचना लक्षात घेऊन ही नवीन वेतन रचना तयार करण्यात आली आहे.  पेटीएम कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा ( एजीएम ) येत्या 12 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. आणि त्याच्या आधीच कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रस्तावावर विचार सुरु असल्याचे म्हटले आहे.

मानद संचालकांचे मानधन घटविणार

याआधी अशित रंजीत लीलानी यांच्यासह पेटीएम कंपनीच्या बोर्ड सदस्यांतील नॉन- एक्झुकेटिव्ह इंडिपेन्डन्स डायरेक्टरचे मानधन 1.65 कोटी रुपये निर्धारित केले होते. तर गोपालसमुद्रम श्रीनिवास राघवन सुंदरराजन यांचे मानधन 2.07 कोटी रुपये निर्धारित केले होते. नवीन सुधारित रचनेनुसार प्रत्येक नॉन- एक्झुकेटिव्ह इंडिपेन्डन्स डायरेक्टरचे मानधन कमाल 48 लाख रुपयांपर्यंत मर्यादित असणार आहे. ज्यात 20 लाख रुपये का एक निश्चित वेतन असणार आहे. या निर्णयाने सुशासन राबविता येणार आहे. सुधारित मेहनताना संरचना 1 एप्रिल, 2024 पासून लागू होणार आहे.