नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : टाटा हे भारताचा सर्वात मोठे औद्योगिक घराणे आहे. रतन टाटा (Ratan Tata) हे त्या समूहाचे प्रमुख आहेत. रतन टाटा यांच्याविषयी तरुणाईला विशेष आकर्षण आहे. श्रीमंती पायाशी लोळण घेत असताना ही मानवी मूल्य जपणाऱ्या टाटांचा हा गुण अनेकांना भावतो. त्यांचा विनम्रता, मृदू स्वभाव आणि सामाजिक कार्यातील त्यांचे योगदान अनेकांना प्रेरणादायी आहे. आजारी कर्मचाऱ्याला त्याच्या घरी जाऊन विचारपूस करणारे ते विरळच म्हणावे लागतील. त्यांचा हाच गुण आजही अनेकांच्या मनात घर करतो. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram Post) एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट काही मिनिटातच व्हायरल झाली. नेटकऱ्यांनी टाटा यांचे कौतुक केले. काय केले आहे रतन टाटा यांनी आवाहन?
श्वान प्रेमी म्हणून ओळख
रतन टाटा हे श्वान प्रेमी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याकडे सर्व जातीचे कुत्रे आहेत. पण रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांविषयी त्यांना विशेष आत्मियता आहे. त्यांनी यापूर्वी भटक्या कुत्र्यांसाठी निवारा उभारण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी एका कुत्र्याचा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. हा कुत्रा हरवलेला असून त्याच्या मालकाने तो घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हा कुत्रा मुंबईतील त्यांच्या मुख्यालयात कुत्र्यांसाठी खास सोय करण्यात आली आहे.
कुत्र्याचा फोटो केला शेअर
या हरवलेल्या कुत्र्याचा फोटो त्यांनी इन्स्टावर शेअर केला. हा कुत्रा माझ्या ऑफिसमधील सहकाऱ्यांना मुंबईतील सायन हॉस्पीटलजवळ सापडला. तुम्ही जर या कुत्र्याचे मालक असाल अथवा तुम्हाला याविषयी काही माहिती असेल तर ती शेअर करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यासाठी एक ईमेल आयडी पण या पोस्टमध्ये त्यांनी दिला आहे. त्यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भटक्या कुत्र्यांशी मैत्री
उद्योगपती रतन टाटा यांना कुत्र्यांबदद्ल जिव्हाळा आहे. ते डॉग लव्हर आहेत, हे जगजाहीर आहे. भटक्या कुत्र्यांसाठी ते काम करतात. त्यातील अनेक कुत्रे त्यांच्याकडे आहेत. ते भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मोठी रक्कम दान करतात. गोव्यातील एका रस्त्यावर भटक असलेला कुत्रा त्यांनी सोबत घेतला. आज तोच त्यांचा सर्वात लाडका कुत्रा आहे. तो अनेकदा त्यांच्यासोबत दिसतो.