पेटीएम वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी; कोरोनाशी संबंधित कर्जावरील सर्व व्यवहार आता निःशुल्क

| Updated on: May 10, 2021 | 5:34 PM

हे प्रत्यक्षात एक अॅप्लिकेशन आहे ज्याद्वारे ऑनलाईन देयकाची प्रक्रिया सुलभ होते. हा वास्तवात बँक आणि मर्चंट साईटमधील पूल आहे. (Big news for Paytm users; All corona related loan transactions are now free)

पेटीएम वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी; कोरोनाशी संबंधित कर्जावरील सर्व व्यवहार आता निःशुल्क
पेटीएम वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाशी संबंधित सर्व कर्जांवर आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पेटीएमने जाहीर केले आहे की, ते देशभरातील सर्व नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना 0% व्यवहार शुल्काद्वारे पेमेंट गेटवे सेवा प्रदान करीत आहेत. पेटीएम म्हणतो की याद्वारे जलद आणि अखंड कोविड मदत कार्यात जास्तीत जास्त संसाधने एकत्रित केले जाऊ शकेल. कंपनीने म्हटले आहे की ती देशभरातील स्वयंसेवी संस्थांना ते आपली पेमेंट गेटवे सेवा देत आहे, जे महामारीच्या काळात लोकांना मदत करण्याचे कौतुकास्पद काम करत आहेत. गेल्या कित्येक आठवड्यांमध्ये पेटीएम पेमेंट गेटवेमधून स्वयंसेवी संस्थांना देणग्या देण्यामध्ये 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Big news for Paytm users; All corona related loan transactions are now free)

पेमेंट गेटवे म्हणजे काय?

– आपण वीज, पाणी आणि मोबाईल बिलांचे जे ऑनलाईन पेमेंट करता ते पेमेंट गेटवेद्वारे होते. आपण कोणत्याही ऑनलाईन साईटवर बिल भरल्यावर आपण पेमेंट गेटवेवर जाऊन कार्ड तपशील आणि पासवर्ड प्रविष्ट करता.

– हे प्रत्यक्षात एक अॅप्लिकेशन आहे ज्याद्वारे ऑनलाईन देयकाची प्रक्रिया सुलभ होते. हा वास्तवात बँक आणि मर्चंट साईटमधील पूल आहे.

– आपण ऑनलाईन साईटवर पेमेंट केल्यास मर्चंट साईट आपल्या डेबिट / क्रेडिट कार्डचा तपशील पेमेंट गेटवेकडे कन्फर्मेशनसाठी पाठवते.

– त्यानंतर, पेमेंट गेटवे बँकेकडून ही माहिती व्हेरीफाय करते आणि आपल्या खात्यातून पैसे काढते आणि व्यापार्‍याच्या खात्यावर पाठवते.

यामुळे काय होईल?

– यानंतर स्वयंसेवी संस्था डिजिटल पेमेंट घेण्यास सक्षम असतील. कारण पेटीएमने या व्यवहार संबंधित शुल्क संपवले आहे.

– पेटीएम म्हणते की पेटीएम पेमेंट गेटवेची इंटिग्रेशन प्रोसेस खूप सोपी आहे. बिझनेसमन सहजपणे हे आपल्या बिझनेस वेबसाईटवर जोडू शकतात.

– पेटीएम पेमेंट गेटवेची वेबसाईट चेक-आउट सिस्टम खूप सुरक्षित आहे. हे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, युपीआय आणि पेटीएम वॉलेट यासारख्या सर्व पेमेंट मोडची देयके स्वीकारण्यास अनुमती देते. (Big news for Paytm users; All corona related loan transactions are now free)

इतर बातम्या

Toyota च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन लोकप्रिय गाड्यांबाबत कंपनीचा मोठा निर्णय

Maharashtra Scholarship Exam Postponed:पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाड यांची घोषणा