नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : भारतीय शेअर बाजाराच्या (Share Market) घौडदौडीची सध्या जगभर चर्चा सुरु आहे. इतकेच नाही तर काही हटके प्रयोगाची पण जगाने दखल घेतली आहे. प्रगत देशापेक्षा भारतीय बाजाराने मोठी आघाडी घेतली आहे. गुंतवणूकदार आणि ब्रोकर्ससाठी अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारातील व्यवहार अवघ्या एका दिवसावर (T+1 Settlement) आणण्याची करामत साधली. यावर्षी सुरूवातीला हा प्रयोग झाला होता. आता तर SEBI ने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. स्टॉक मार्केटमध्ये आता झटपट सेटलमेंट होणार आहे.
काय होती व्यवस्था
गेल्या वर्षी शेअर बाजारात सौदा पूर्ण झाल्यावर त्याचे अपडेट तीन दिवसांत खात्यात दिसत होते. म्हणजे पैसे तिसऱ्या दिवशी खात्यात जमा होत होते. जगभरात जवळपास इतक्याच दिवसांतच सौदे पूर्ण होतात. भारताने काही दिवसांनी हा कालावधी कमी केला आहे. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारातील व्यवहार अवघ्या एका दिवसावर (T+1 Settlement) आणला. आता तर त्यापुढेचं पाऊल टाकण्यात सेबीला यश आले आहे.
झटपट पैसा खात्यात
सेबीने दोन टप्प्यात सेटलमेंट (T+0) ऐवजी झटपट सेटलमेंटचा (Instant Settlement) प्रस्ताव दिला आहे. सेबीने याविषयी लोकांच्या हरकती आणि अभिप्राय पण मागवला आहे. हा प्रस्ताव सध्याच्या T+1 पेक्षा वेगळा असेल. या नियमाचा गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा होईल. कारण त्यांना शेअर विक्रीची रक्कम अवघ्या काही वेळातच खात्यात जमा होईल.
गुंतवणूकदारांकडे तीन पर्याय