इलेक्ट्रिक कार बाजारात रिलायन्सची एंट्री; मुकेश अंबानी यांच्या नवीन खेळीने कंपन्या पडणार गार

| Updated on: Apr 11, 2024 | 3:26 PM

Reliance Electric Car : भारतीय बाजारपेठ झपाट्याने इलेक्ट्रिक वाहनांकडे झुकत आहे. पेट्रोल आणि डिझेल कारविषयी केंद्र सरकारने अगोदरच भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारतीय बाजारात आता लवकरच रिलायन्सची सुद्धा इलेक्ट्रिक कार दिसू शकते. त्यासंबंधीची बोलणी सुरु आहे.

इलेक्ट्रिक कार बाजारात रिलायन्सची एंट्री; मुकेश अंबानी यांच्या नवीन खेळीने कंपन्या पडणार गार
रिलायन्सची इलेक्ट्रिक कार बाजारात लवकरच एंट्री
Follow us on

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची दिवसागणिक विक्री वाढत आहे. सध्या टाटा मोटर्सने त्यात आघाडी घेतली आहे. भारतीय बाजारपेठेत एंट्री घेण्यासाठी Tesla तयारीत आहे. टेस्लाचा सीईओ एलॉन मस्क याच महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात दाखल होत असल्याचे वृत्त आहे. मस्क यानेच याविषयीची ट्विट केले आहे.आता बिझनेस लाईनच्या एका वृत्तानुसार, टेस्ला भारतात प्रकल्प उभारण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) मदत घेणार आहे.

हा योगायोग नाही

बिझनेसलाईनच्या दाव्यानुसार, गेल्या महिनाभरापासून रिलायन्स आणि टेस्लातील अधिकारी यांच्यात ही चर्चा सुरु आहे. मस्क भारत भेटीवर येत आहे. म्हणजे हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी मस्क याने त्यांची भेट घेतली होती. भारत सरकारने नुकतीच इलेक्ट्रिक वाहनविषयीचे धोरण एका आठवड्यापूर्वीच जाहीर केले आहे. या सर्व घडामोडी निव्वळ योगायोग नक्कीच नाहीत .

हे सुद्धा वाचा

रिलायन्सच्या भूमिकेकडे लक्ष

बिझनेस लाईनच्या वृत्तानुसार, दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी कशा एकत्र येतात, त्यांचा संयुक्त उपक्रम काय, याविषयीची माहिती समोर आलेली नाही. रिलायन्सने पण याविषयीचा खुलासा केलेला नाही. सूत्रानुसार, टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची निर्मिती, त्यासंबंधीची सुविधा पुरविण्याचे काम रिलायन्स करु शकते.

2 ते 3 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक

टेस्लाची एक टीम भारतात तळ ठोकून असल्याचे समजते. त्यानुसार, टेस्ला देशात 2 ते 3 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. Financial Times च्या वृत्तानुसार, टेस्ला या महिन्यात भारतात एक तज्ज्ञांची टीम पाठविण्याची योजना आखत आहे. ही टीम भारतामधील महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यात प्रकल्पासाठी योग्य जमीन शोधत आहे. केंद्र सरकारने देशात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय देण्याचा प्रयोग देशात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यातंर्गत भारताने कमीत कमी 500 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणे आणि स्थानिक व्हेंडर्सकडून या कंपन्यांनी माल घ्यावा लागणार आहे. अशा कंपन्यांना इंपोर्ट ड्युटीमध्ये मोठी सवलत देण्यात येणार आहे.

भारतासाठी जर्मनीत उत्पादन

एका वृत्तानुसार, लेफ्ट हँड ड्राईव्ह कार तयार करणारी टेस्ला कंपनीने जर्मनीतील त्यांच्या प्रकल्पात राईट हँड ड्राईव्ह कारचे उत्पादन सुरु केले आहे. जागतिक वृत्तसंस्था Reuters च्या वृत्तानुसार, याच वर्षात जर्मनीहून टेस्लाची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल होईल. अर्थात टेस्लाचे कोणते मॉडल भारतात उतरविण्यात येईल, याविषयी कोणताही खुलासा झालेला नाही.