मुंबई : एकीकडे पेट्रोल (petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या अकरा दिवसांमध्ये तब्बल नऊ वेळेसे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. मात्र दुसरीकडे राज्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे व्हॅट कमी करण्यात आल्याने आजापासून सीएनजी (CNG) आणि पीएनजीचे दर स्वस्त झाले आहेत. जीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात साडेतीन रुपयांची घसरण झाली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची अधिसूचना देखील काढण्यात आली होती. अखेर आजापासून आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार सीएनजीमध्ये सहा रुपयांची तर पीएनजीमध्ये साडेतीन रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईत आता सीएनजीची किंमत साठ रुपये प्रति किलो झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूष होते. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी स्वस्त झाल्याने वापर वाढेल आणि प्रदूषणाला आळा बसेल असं अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पाच्या वेळी सांगितले होते. अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे अखेर सीएनजीवरील व्हॅट कपात करण्यात आला असून, सीएनजीचे दर सहा रुपयांनी तर पीएनजीचे दर साडेतीन रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
दरम्यान एकीकडे राज्यात सीएनजीचे दर स्वस्त झाले आहेत तर दुसरीकडे मात्र व्यवसायिक गॅसच्या दरात प्रति सिलिंडर 250 रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी OMCs ने दिलेल्या माहितीनुसार आजपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 22 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, तर व्यवसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते. मात्र आज घरगुती सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
अरे देवा, Crypto कमाईचे नव्हे फसवणुकीचे मायाजाल, काही क्षणातच गायब संपूर्ण माल
…तर भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर घसघशीत सूट
व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, हॉटेलमधील जेवन महागणार?