LPG Cylinder KYC Update Process : वेळेसोबत अनेक सोयी-सुविधा आल्या आहेत. गॅस तर जवळपास अनेक घरात पोहचला आहे. गावखेड्यातही गॅस पोहचला आहे. अनेक शहरात गॅस पाईप लाईन पोहचली आहे. सध्या भारतात अनेक घरात एलपीजी सिलेंडरवर स्वयंपाक होतो. याशिवाय ग्रामीण भागात उज्ज्वला योजनेतंर्गत गॅस सिलेंडरचा वापर करण्यात येत आहे. तुमच्या घरी गॅस सिलेंडर येत असेल आणि तुम्ही हे काम केले नसेल तर मात्र तुमचे कनेक्शनच कट होऊ शकते. त्यासाठी हे काम झटपट करावे लागणार आहे.
e-KYC केले की नाही
गॅस सिलेंडर मिळण्यासाठी देशभरात कंपन्यांनी ई-केवायसी करण्यासाठी सक्तीची मोहिम सुरु करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. ज्या ग्राहकांनी अद्यापही गॅस सिलेंडरसंबंधीची ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना कदाचित काही दिवसांनी सिलेंडर देण्यात येणार नाही. विना ई-केवायसी गॅस-सिलेंडर पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
ई-केवायसी का गरजेचे?
उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. विना ई-केवायसी सबसिडी संपेल. तर कनेक्शन पण ब्लॉक होऊ शकते, असे निर्देश केंद्र सरकारने दिलेले आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याने उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये एलपीजीची सबसिडी रक्कम जमा होत आहे.
कसे कराल ई-केवायसी?
घरगुती गॅसधारकांना ई-केवायसीसाठी त्यांच्या गॅस एजन्सीकडे जावे लागेल. तुमच्या गॅस एजन्सीकडे ही प्रक्रिया एकदम सोप्या पद्धतीने होईल. त्यासाठी ग्राहकांना त्यांचे आधार कार्ड सोबत घेऊन जावे लागेल. आधार कार्डचा पडताळा झाला की, ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल. आधार कार्डद्वारे पडताळा करण्यात येईल की, त्याच व्यक्तीला गॅस सिलेंडर मिळत आहे का?
सबसिडीची मुदत वाढवली
गेल्या मार्च महिन्यात, केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत गरीब महिलांना 300 रुपये प्रति सिलेंडरची सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी मार्च 2024 पर्यंत लागू होती. आता ही सबसिडी 31 मार्च 2025 रोजीपर्यंत वाढविण्यात आली आहे. सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.