नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2024 : बिटकॉईनने नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले. या वर्षाच्या सुरुवातीलाच 2024 मध्ये बिटकॉईनची किंमत विक्रमीस्तरावर, 45 हजार डॉलरवर पेक्षा पुढे गेली आहे. या किंमतीत अजून उसळीची शक्यता आहे. अमेरिकन सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) स्पॉट बिटकॉईन एक्सचेंज ट्रेडेड फंडची (ETF) सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा हा परिणाम असल्याचा दावा करण्यात येत आहे. बिटकॉईन गुंतवणूकदारांना या तेजीच्या सत्रामुळे लॉटरी लागली आहे.
अडीच वर्षानंतर केला चमत्कार
क्रिप्टो करन्सीत अडीच वर्षानंतर बिटकॉईनला उच्चांकी झेप घेता आली. अडीच वर्षांपूर्वी 12 एप्रिल 2022 रोजी बिटकॉईनने पहिल्यांदा 45 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला होता. मंगळवारी बिटकॉईनच्या किंमतीत 6 टक्क्यांची उसळी आली. हा आकडा 45 हजार डॉलरच्या पुढे गेला. बिटकॉईनचा भाव 21 महिन्यांच्या सर्वाधिक उच्चांकावर 45386 डॉलरपर्यंत पोहचला होता.
क्रिप्टो मार्केटच्या इतर चलनात पण उसळी
क्रिप्टो मार्केटमध्ये अनेक चलन आहेत. त्यांच्यात ही तेजीचे सत्र आले आहे. बिटकॉईन प्रमाणे त्यांच्यात पण तेजी आहे. यामध्ये एथरमध्ये (ETH) 3.8 टक्के, सोलानामध्ये (SOL) 7 टक्के आणि कार्डोनामध्ये जवळपास 5 टक्क्यांची उसळी आली आहे. क्रिप्टोविषयी केंद्र सरकार आणि आरबीआयने नियम कडक केले आहेत. आता तर त्यातील काहींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
ईटीएफ मंजूरासाठी 10 जानेवारीपर्यंतचा वेळ
Reuters च्या रिपोर्टनुसार, स्पॉट बिटकॉईन एक्सचेंज ट्रेडेड फंड सुरु करण्यासाठी हिरवा झेंडा मिळाला आहे. लवकरच हा एक्सचेंज सुरु होईल. या चर्चांमुळे बिटकॉईनच्या किंमतीत तेजीचे सत्र आले आहे. अमेरिकेतील एसईसी या 10 जानेवारीपर्यंत आर्क/21 शेअर्स ईटीएफला (Ark/21Shares ETF) मंजूरी देऊ शकते. अथवा मंजूरी नाकारु शकते. पण या ईटीएफला मंजूरी मिळण्याचीच शक्यता अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. एसेट मॅनेजमेंट कंपन्यांना सर्वात अगोदर स्पॉट बिटकॉईन ईटीएफची मंजूरी मिळू शकते. यामध्ये ब्लॅक रॉक एसेट मॅनेजमेंट, वॅनइक, वल्कारी इन्व्हेसमेंट्स, बिटवाईज, इनवेस्को, फिडेलिटी आणि व्हिजिडम ट्री या एसेट मॅनेजमेंट कंपन्याचा समावेश आहे.