नवी दिल्ली | 9 March 2024 : तर क्रिप्टोकरन्सी बाजारात गुंतवणूकदारांचा भांगडा सुरु आहे. आनंदाचे वारे वाहत आहे. आताच 5 मार्च रोजी रात्री बिटकॉईने 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडीत काढला होता. 69 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला होता. तर काल रात्री पुन्हा नवीन रेकॉर्ड बिटकॉईनने तयार केला. 70 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला. इथेरियमसह इतर क्रिप्टो करन्सी सध्या तेजीचे वारे आहे. त्यामागे अमेरिकन सरकारचे बदलले धोरण आहे. तर युरोपियन राष्ट्रांसह काही देशांनी क्रिप्टोविषयीची भूमिका बदलल्याचा परिणाम आहे. मग तुम्ही क्रिप्टोत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?
बरं हे तेजीचे सत्र का?
मध्यंतर बिटकॉईन आणि इतर आभासी चलन जणू चर्चेच्या बाहेर फेकले गेले होते. त्यांच्यात प्रचंड घसरण झाली होती. पण जानेवारीनंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजीचे सत्र आले आहे. बिटकॉईन ईटीएफ(Bitcoin ETF) हे या तेजीमागील खरे कारण आहे. अमेरिकेच्या बाजार नियंत्रकाने ईटीएफला मंजुरी दिली आहे. मेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने 11 स्पॉट बिटकॉईन ईटीएफला मंजुरी दिली. अर्थात त्यासाठी कोर्टकचेऱ्या झाल्या. पण हा विषय निकाली निघाला. त्यामुळे आता गुंतवणूकदार विश्वासाने गुंतवणूक करत आहेत.
बिटकॉईन सर्वकालीन उच्चाकांवर
मंगळवारी जागतिक बाजारात बिटकॉईनचा भाव 28 महिन्यांच्या विक्रमी स्तरावर पोहचला होता. नोव्हेंबर 2021 मध्ये बिटकॉईनच्या नावावर 68,991 डॉलरचा विक्रम आहे. हा रेकॉर्ड इतिहासजमा झाला. व्यापारी सत्रात बिटकॉईन 69,208.79 डॉलरच्या पण पुढे गेले होते. शुक्रवारी रात्री 70 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे या 28 महिन्यात बिटकॉईन 20 हजार डॉलरहून निच्चांकावर पोहचले होते. व्याजदर वाढल्याने हा फरक दिसून आला.
का करु नये गुंतवणूक