जुलै महिन्याच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प हे नॅशविले बिटकॉईन कॉन्फ्ररन्समध्ये पोहचले होते. त्यावेळीच त्यांनी जगाला नवीन संदेश दिला होता. सत्तेत परतलो तर अमेरिकेला जगाची क्रिप्टो कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी या परिषदेत केली होती. त्यावेवळी बिटकॉईनच्या किंमतीत 4 टक्क्यांपेक्षा अधिकची उसळी दिसली होती. तेव्हा बिटकॉईन 67 हजार डॉलरच्या घरात पोहचला होता. अमेरिकन निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमत मिळवले. आता 20 जानेवारी 2025 रोजी ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. त्यापूर्वीच क्रिप्टोकरन्सीत बिटकॉईनने नवीन इतिहास रचला. बिटकॉईनची किंमत एक लाख डॉलरच्या घरात पोहचल्या. 5 नोव्हेंबरपासून बिटकॉईनच्या किंमतीत 50 टक्क्यांहून अधिकची उसळी दिसली आहे. सध्या काय आहे बिटकॉईनची किंमत?
Bitcoin एक लाख डॉलरच्या पुढे
कॉईन मार्केटच्या आकडेवारीनुसार, बिटकॉईनचा भाव 7 टक्क्यांच्या तेजीसह 102,656.65 डॉलरवर व्यापार करत आहे. व्यापारी सत्रा दरम्यान बिटकॉईनच किंमत 103,900.47 डॉलरवर पोहचली आहे. बिटकॉईनच्या किंमतीत मोठी तेजी दिसली आहे. बिटकॉईनचा भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात बिटकॉईनचा भाव 94,660.52 डॉलरसह निच्चांकावर पण पोहचला होता. बिटकॉईनचा भाव लवकरच 1.25 लाख डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी दिनी 20 जानेवारी 2025 रोजी बिटकॉईन हा ऐतिहासिक उच्चांक गाठू शकतो.
एका महिन्यात 50 टक्क्यांचा फायदा
जेव्हापासून अमेरिकेमधील निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. तेव्हापासून जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनच्या किंमतीत मोठी तेजी दिसून आली. म्हणजे बिटकॉईनच्या भावात 50 टक्क्यांहून अधिकची उसळी आली आहे. गेल्या एका आठवड्यापासून बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर एका वर्षात बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 145 टक्क्यांहून अधिकची कमाई करुन दिली आहे. या वर्षाअखेर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे एलॉन मस्क यांच्या आवडत्या क्रिप्टोकरन्सनीकडे सुद्धा सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. मस्क याने अमेरिकेमधील निवडणुकीत डॉगकॉईन आणि ट्रम्प यांचे जाहीर समर्थन केले होते. मस्क याच्या संपत्तीत आणि चलनात मोठी वाढ झाली आहे. आता डॉगकॉईन अजून भरारी घेण्याची शक्यता आहे.