भारतीय शेअर बाजारात काही स्टॉक असे आहेत, ज्यांनी अगदी कमी वेळेत गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला. Elcid Investment या शेअरची आरती अजून संपलीच नाही तर या स्टॉकचं कौतुक कानावर येऊन धडकलं आहे. गेल्या 14 महिन्यात या स्टॉकने जमिनीवरून आकाशात भरारी घेतली आहे. 35 पैशांचा हा स्टॉक सध्या 24.41 रुपयांवर पोहचला आहे. त्याच्या या गगन भरारीने गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले झाली आहे.
महिनाभरापासून अप्पर सर्किट
बिट्स लिमिटेड (Bits Ltd) या कंपनीने हा पराक्रम केला आहे. या शेअरने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार रिटर्न दिला आहे. केवळ 35 पैशांचा हा स्टॉक अवघ्या काही महिन्यात 24.41 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना 6874 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या शेअरमध्ये सातत्याने 2% अप्पर सर्किट लागला आहे. हा शेअर अजूनही तेजीवर स्वार आहे.
असे केले करोडपती
14 महिन्यांपूर्वी बिट्स लिमिटेडचा शेअर अवघ्या 35 पैशांना मिळत होता. आता त्याची किंमत 24.41 रुपयेवर पोहचला. ज्यांनी या शेअरमध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली. ती गुंतवणूक आता जवळपास 70 लाख रुपये झाली आहे. हा आकडा गुंतवणूकदारांना हैराण करणारा आहे. या कंपनीने 14 महिन्यात मोठा नफा मिळवला. जर एखाद्याने या कंपनीत दीड लाख रूपयांची गुंतवणूक केली असेल तर ही रक्कम 1 कोटी रुपयांहून अधिक झाली असती. या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे.
गुंतवणूकदारांना मिळाला 8 पट रिटर्न
गेल्या सहा महिन्यात बिट्स लिमिटेडच्या शेअरने 727 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. मे 2023 मध्ये या स्टॉकची किंमत 2.95 रुपये इतकी होती. आता हा स्टॉक 24.41 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजे सहा महिन्यातच गुंतवणूकदारांना एक लाखांच्या गुंतवणुकीवर जवळपास 8 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
आता झाला दुप्पट
सप्टेंबर 2023 मध्ये बिट्स लिमिटेडचा शेअर 12.32 रुपयांवर होता. तो आता वाढून 24.41 रुपयांवर पोहचला आहे. अवघ्या दोन महिन्यात गुंतवणुकदारांची रक्कम दुप्पट झाली आहे. बाजारात चढउताराचे सत्र सुरू असताना काही स्टॉक, छोटा पॅकेट बडा धमाका ठरले आहेत. हे स्टॉक धमाकेदार ठरत आहेत. त्यात बिट्स लिमिटेडने मोठी आघाडी घेतली आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.