शेअर बाजाराने घेतलेल्या उसळीनंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. याशिवाय आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून देखील त्यांची वर्णी लागली आहे. आता त्यांची स्पर्धा जेफ बेझोस आणि इलॉन मस्क यांच्याशी होत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अदानीची ही ‘झेप’ म्हणजे गरुडझेपच म्हणावी लागेल. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index), त्यांची एकूण संपत्तीमध्ये जवळपास वर्षभरात 64.8 अब्ज डॉलरवरून 141.4 अब्ज डॉलरने दुप्पट झाली आहे. त्यामुळे ते आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
गौतम अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अदानी टोटल गॅस लिमिटेड 750 पटींपेक्षा जास्त आश्चर्यकारक नफा कमवीत आहेत तर अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी ट्रान्समिशन लिमिटेडचे मूल्य 450 पट आहे आहे. तुलनेने इलॉन मस्कच्या टेस्ट इंकचे प्राइस टु अर्निंग रेशो सुमारे 100 पट आहे. भारतातले स्वाधीन श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 28 पट नफा कमवीत व्यापार करते.
अदानी यांनी आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. अदानी यांना खंडणीसाठी ओलीस ठेवण्यात आले होते. याशिवाय ते एका अतिरेकी हल्य्यातही थोडक्यात बचावले आहेत. गौतम अदानी हे ‘कॉलेज ड्रॉप आउट’ आहेत. त्यांनी 1980 च्या दशकाच्या सुरुवातीस कोळसा जलवाहतूक क्षेत्रात जाण्याआधी मुंबईमध्ये हिरे व्यवसायात आपले नशीब आजमावले. अत्यंत मेहनती असलेले गौतम अदानी. विमानतळ, मीडिया आणि सिमेंट सारख्या अनेक मोठ्या क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या व्यवसायाचे साम्राज्य निर्माण केले. गत वर्षी, त्यांनी जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा प्रकल्प बनविण्यासाठी 70 अब्ज डॉलर गुंतवणुकीची इच्छा दर्शविली. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात केंद्र सरकारने अडाणी यांना ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे.