इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी पीव्हीव्ही इन्फ्रा लिमिटेडच्या (PVV Infra Limited) गुंतवणूकदारांना लॉटरी लागली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 1:1 या प्रमाणात बोनस शेअरला मंजूरी दिली आहे. प्रत्येक शेअरवर कंपनी एक अतिरिक्त शेअर देणार आहे. या ऑफर नंतर शेअर खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या. त्यामुळे हा शेअरमध्ये शुक्रवारी 5 टक्क्यांची वाढ दिसली. हा शेअर 15.92 रुपयांवर बंद झाला. गेल्या पाच दिवसांत हा शेअर 8 टक्क्यांनी वधारला. तर एका महिन्यात या शेअरमध्ये 25 टक्क्यांची घसरण झाली.
कंपनीकडे इतके मार्केट कॅप
पीव्हीव्ही इन्फ्रा लिमिटेडचा शेअर आज 15.92 रुपयांवर पोहचला. गेल्या पाच दिवसांत हा शेअर 8 टक्क्यांनी वधारला. तर एका महिन्यात या शेअरमध्ये 25 टक्क्यांची घसरण झाली. एका वर्षात हा शेअर 50 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारला. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 35.82 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 10 रुपये इतकी आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 43.90 कोटी रुपये इतके आहे.
काय करते ही कंपनी व्यवसाय
पीव्हीव्ही इन्फ्रा लिमिटेड ही एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. ही कंपनी छतावर सौरऊर्जा उभारते. कंपनी संपूर्ण देशात औद्योगिक, निवासी, वाणिज्य आणि फ्लोटिंग सोलर रूफटॉप सिस्टिम सेवा पुरवते. रुफटॉप सौरऊर्जा योजनांचा वापर करुन ही कंपनी ग्राहकांपर्यंत सेवा पोहचवते. ही कंपनी सर्वोत्त गुणवत्ता असलेली उपकरण पुरवते आणि सौरऊर्जा उभारते.
शुक्रवारी बाजारात घसरण
बीएसई आणि एनएसई शेअर बाजाराच्या तेजीला शु्क्रवारी लागला. जागतिक स्तरावरील घडामोडीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात शुक्रवार घसरण झाली. 30 शेअरचा बीएसई सेन्सेक्स 1.08 अंकाची घसरण झाली. तो 80,981.95 अंकावर बंद झाला. तर एनएसई निफ्टीमध्ये 1.17 टक्क्यांची घसरण होऊन तो 24,717.70 अंकावर बंद झाला. शेअर बाजारात गेल्या पाच दिवसांच्या तेजीला यामुळे ब्रेक लागला.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.