Bournvita Controversy : बॉर्नविटा कंपनीला सरकारचा झटका, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

| Updated on: Apr 29, 2023 | 8:58 PM

बॉर्नविटा लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो. कारण बोर्नविटामध्ये साखरेशिवाय अशा अनेक गोष्टी आढळून येत आहेत ज्या लहान मुलांसाठी हानिकारक ठरू शकतात.

Bournvita Controversy : बॉर्नविटा कंपनीला सरकारचा झटका, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
Follow us on

मुंबई : लहान मुले दुधात बॉर्नविटा टाकून आवडीने पितात. तसेच आजकाल लोक त्यांच्या मुलांना मोठ्या प्रमाणात बोर्नविटा देताना दिसतात. पण आता हाच बॉर्नविटा लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो. कारण बॉर्नविटामध्ये साखरेशिवाय अशा अनेक गोष्टी आढळून येत आहेत ज्या लहान मुलांसाठी हानिकारक ठरू शकतात.

लहान मुलांच्या या आवडत्या हेल्थ पावडर ड्रिंक बॉर्नविटाला चाइल्ड राइट्सने नोटीस पाठवली आहे. तसंच बोर्नविटा कंपनीला चाइल्ड राइट्सने लोकांची दिशाभूल करणारी जाहिरात ताबडतोब काढून टाकण्यास सांगितले आहे. आयोगाने सांगितलं की,  बॉर्नविटामध्ये साखर मिसळली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. हे लहान मुलांना धोकादायक ठरू शकते.

या प्रकरणी आयोगाने बॉर्नविटा कंपनीकडून 7 दिवसांमध्ये उत्तर मागितले आहे. तर आज आपण जाणून घेऊया, नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण ज्यावरून हा वाद झाला आणि बाल मंत्रालयाला यात हस्तक्षेप का करावा लागला.

चाइल्ड राइट्सने बॉर्नविटाला सांगितले की, बॉर्नविटामध्ये साखर मिसळली जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत की. सोबतच या पावडरमध्ये वापरल्या जाणार्‍या अन्य मिश्रणाचा फॉर्म्युला लहान मुलांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे कंपनीला ग्राहकांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती काढून टाकण्यास सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वीच एका तरूणाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने बोर्नविटामध्ये साखरेचे प्रमाण अधिक वापरण्याबाबत सांगितले आहे. तसंच त्याने सांगितले की,  बॉर्नविटा पावडरमध्ये साखर, कोको सॉलिड्स आणि कॅन्सर निर्माण करणारे घटक असतात जे लहान मुलांना हानिकारक ठरू शकतात. तरूणानं शेअर केलेल्या व्हिडीओनंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे.

बॉर्नविटा ब्रँड किती जुना?

1920 मध्ये बॉर्नविटा जगात पहिल्यांदा लाँच करण्यात आला होता. त्यानंतर 1948 मध्ये तो भारतात आला. तेव्हापासून बोर्नविटा मुलांचे आवडते पेय बनले आहे. तसेच या कंपनीने  फक्त शहरातच नाही तर गावाकडेही आपलं स्थान निर्माण केलं आहे.