मुंबई : देशातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (BSE Limited) ने शेतकऱ्यांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म लॉंच केला आहे. बीएसईने कृषी उत्पादनांसाठी (Agricultural Commodities) एक इलेक्ट्रॉनिक स्पॉट प्लॅटफॉर्म (Electronic Spot Platform) आणला आहे. या प्लॅटफॉर्मचे नाव BSE e-Agricultural Markets Ltd (BEAM)हे आहे. शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी BEAM राष्ट्रीय स्तरावर इलेक्ट्रॉनिक स्पॉट प्लॅटफॉर्मच्या रुपात काम करेल. या ठिकाणी शेतकरी त्यांची उत्पादनं इलेक्रट्रॉनिक माध्यमांद्वारे ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी ठेवतील. इथं शेतकऱ्यांच्या मालाची ऑनलाईन पद्धतीनं विक्री केली जाईल, यामुळं विक्रीसाठी बोली लागलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. (BSE launches e agricultural spot market platform for agricultural commodities BEAM)
BEAM शेतकरी, व्यापारी आणि इतर संबंधित घटकांना शेतमाल खरेदी विक्रीतील इतर अडचणींपासून मुक्त करेल. एक्सचेंजच्या माहितीनुसार प्लॅटफॉर्म मध्यस्थासारखं काम करेल. कमी खर्च, उच्च खरेदी क्षमता यासह उत्पादकांना योग्य लाभ आणि एकाहून अधिक ग्राहकांमध्ये उत्पादनाचे दर निश्चित करेल. BEAM ही व्यवस्था उत्पादनांची खरेदी आणि व्यापार यात येणाऱ्या अडचणींना देखील दूर करेल, अशी माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनं दिली आहे. (BSE launches e agricultural spot market platform for agricultural commodities BEAM)
BSE चे एमडी आशीष कुमार चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसई राष्ट्रीय स्तरावर वस्तूंच्या वितरणासाठी नेटवर्क तयार करत आहे. या नेटवर्कद्वारे वस्तूंची खरेदी पारदर्शक पद्धतीनं केली जाणार आहे. या नव्या व्यवस्थेद्वारे खरेदी केलेल्या मालाची रक्कम थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने आणलेल्या नव्या BEAM व्यवस्थेद्वारे शेतकरी एका राज्यांतून दुसऱ्या राज्यातील बाजारांमध्ये पोहोचतील आणि त्यांना मालाची विक्री करता येईल. बीएसईने दिलेल्या माहितीनुसार या प्रणालीचा फायदा फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या गटांना त्याच्या सर्वोत्तम दर्जाचे धान्य विक्रीतून चांगल्या प्रकारचा दर मिळेल. राज्यांकडून माल खरेदी करणाऱ्या मध्यस्थ, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदार यांनाही त्याचा फायदा होणार आहे. (BSE launches e agricultural spot market platform for agricultural commodities BEAM)
BEAM या प्लॅटफॉर्मची सुरुवात 11 डिसेंबरपासून झाली आहे. सध्या हा प्लॅटफॉर्म प्रायोगिक स्वरुपात चालवला जात आहे. बीएसईने दिलेल्या माहितीनुसार हा प्लॅटफॉर्म राष्ट्रीय स्तरावर काम करेल. या प्लॅटफॉर्मची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक देश एक मार्केट या संकल्पनेनुसार करण्यात आली आहे.
VIDEO : Special Report | सीबीआयच्या ताब्यातील तब्बल 45 कोटींचं सोनं गायब https://t.co/DmsWyr4fnc #CBI #gold
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2020
संबंधित बातम्या:
Farmers Protest | शेतकरी आंदोलन : संभाव्य तोडगा काय?
Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर
(BSE launches e agricultural spot market platform for agricultural commodities BEAM)