नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकार 2 मधील पहिलं पूर्ण बजेट सादर केलं. निर्मला सीतारमण या स्वतंत्र कारभार असलेल्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. त्यांनी मांडलेल्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र या बजेटमुळे निराशा झाली. पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणतील अशी अपेक्षा होती, मात्र ते न करता, त्यावरील अधीभार 1 रुपयांनी वाढवला. त्यामुळे सर्वकाही महागणार आहे.
दुसरीकडे बजेटमध्ये वार्षिक उत्पन्न 5 लाखांपर्यंत असणाऱ्यांना आयकरातून सूट देण्यात आली आहे. मात्र हा आकड्यांचा खेळ आणि चालूपणा केलेला आहे. कारण या आयकर सूटमध्ये लपवाछपवी आहे. सध्या अडीच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 3 लाखांपर्यंत आहे.
आता पाच लाखापर्यंत सूट कशी मिळणार?
निर्मला सीतारमण यांनी 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असल्याची घोषणा केली. खरंतर यापूर्वी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता, त्यावेळीही त्यांनी हीच घोषणा केली होती. करमुक्त उत्पन्नासाठी त्यावेळी रिबेटची घोषणा केली होती. म्हणजेच करातील सवलत आणि रिबेट यातून जे उत्पन्न उरतं त्यावर टॅक्स द्यावं लागतं.
टॅक्सची गणना केल्यानंतर रिबेट तुम्हाला इन्कम टॅक्सची रक्कम भरताना तुम्हाला दिलासा देते. हे ते उत्पन्न असतं, ज्यावर करदात्यांना कर द्यावा लागत नाही. उदाहणार्थ 87A नुसार मिळणारं रिबेट. यानुसार जर तुमचं उत्पन्न 3.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 2500 रुपयांचं रिबेट मिळण्यासाठी तुम्ही दावा करु शकता.
5 लाख पर्यंतचं उत्पन्न करमुक्त कसं होणार?
समजा, एखाद्याचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये आहे आणि त्याला 50 हजार रुपये HRA मिळतो. तर मिळालेल्या सूटनंतर त्याचं उत्पन्न 4.5 लाख होतं. जर 80C नुसार 1.5 लाख रुपयांच्या सवलतीचा फायदा घेतला, तर त्याचं उत्पन्न 3 लाख रुपये होईल, ज्यावर त्याला टॅक्स द्यावा लागेल. 5 टक्के हिशोबाने 2500 रुपये टॅक्स द्यावा लागेल. पण 2500 रुपयांचं रिबेट मिळाल्यामुळे हे उत्पन्न करमुक्त होईल.
… तरच सूट मिळणार
5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना आयकरच्या सेक्शन 87A नुसार सूट मिळते. रिटर्न भरल्यानंतरच त्यांना ही सूट दिली जाते. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये असेल, पण तरीही तुम्ही रिटर्न भरत नसाल, तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला उत्पन्न घोषित केल्यानंतरच टॅक्समधील सवलत मिळेल. 5 लाखापर्यंतची सूट ही रिबेट म्हणूनच मिळेल.
सध्याचे टॅक्स स्लॅब