नवी दिल्ली: Budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2021 रोजी म्हणजे थोड्याच वेळात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण प्रयत्न करणार आहेत. 2021-22 च्या बजेटमध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना गिफ्ट देण्याची शक्यता आहे. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना 1 लाख रुपयापर्यंतचं बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकतं. भाजपनं 2019 मधील लोकसभा निवडणुकीत याबाबत आश्वासनं दिलं होते. (Budget 2021 Agriculture Modi Government can declare interest free loan of one lakhs for farmers in budget 2021)
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होते. त्यामध्ये शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा उल्लेख करण्यात आला होता. हे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारनं अद्याप पूर्ण केलेले नाही. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सध्या किसान क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 4 टक्के व्याजदरानं मिळते. देशात किसान क्रेडिट कार्डचा वापर 8 कोटी शेतकरी करतात.
किसान क्रेडिट कार्डनं सहजरित्या कर्ज
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून किसान क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येईल वर्षभरातचं त्याची परतफेड करावी लागणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार यावर 2 टक्के सूट देते. वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते. शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.
सावकारांपासून सुटका करण्याचा प्रयत्न
नरेंद्र मोदी सरकारचे 2022 पर्यंत दुप्पट उत्पन्न करण्याचा प्रयत्न आहे. या दृष्टीनं शेतकऱ्यांना सावकारांच्या जाळ्यातून सोडवण्याचा प्रयत्न आहे.बँकेकडून कर्ज घेऊन शेतकरी शेती करतील, असं सरकारचे उद्दिष्ठ आहे. देशातील प्रत्येक शेतकऱ्यावर सरासरी 47 हजारांचे कर्ज आहे यामधील 12130 रक्कम सावकारांकडून घेतलेली आहे.
शेतकऱ्यांना 15 लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज देण्याचं लक्ष्य नरेंद्र मोदी सरकारचं आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला कर्ज देण्याचं सरकारचं उद्दिष्ठ आहे. यासाठी किसान क्रेडिट कार्डच्या कक्षेत शेतीपूरक व्यवसाय देखील आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. पशुपालन आणि मासेमारीसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्याता मोदी सरकारचा विचार आहे.
किसान क्रेडिट कार्ड कसं बनवणार?
केंद्र सरकारन किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी केली आहे. यासाठी लागणारं प्रक्रिया शुल्क रद्द करण्यात आलं आहे. बँकांना गावांगावामध्ये कँम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या:
Budget Marathi 2021 LIVE : थोड्याच वेळात कॅबिनेट बैठक, बजेटला मंजुरी मिळणार
Budget 2021: काय स्वस्त होणार आणि काय महागणार?
(Budget 2021 Agriculture Modi Government can declare interest free loan of one lakhs on Kisan Credit Card for farmers in budget 2021)